Saturday, September 23, 2023

पाऊस कधी येणार नवी तारीख जाहीर…

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी बॅडन्यूज आहे. पावसाची आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. अजूनही महाराष्ट्रात पाऊस आला नाही. अल निनो आणि चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर गेल्याचं सांगितलं जात आहे.

मान्सूनची वाट अजून पाहावी लागणार आहे. 10 जूनपर्यंत तो जरी केरळ आणि तळकोकणात आल्याचं सांगितलं जात असलं तरी पाऊस मात्र गायब झाला आहे. त्यामुळे बळीराजाची चिंतेत आहे. अजून पेरणी थांबली आहे, पाऊस नसेल तर भातशेतीचं

नुकसान होईल याची चिंता आहे.मान्सून 27 जूनपर्यंत येईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. पावसाच्या अंदाजावर पाणी; राज्यात मोसमी वाऱ्यांचा प्रवास रखडला; २३ जूनपासून सक्रिय होण्याचा नवा अंदाज आहे.

मोसमी पाऊस कोकणात दाखल झाला असला तरी त्याचा पुढील प्रवास खोळंबला आहे. नैऋत्य मोसमी वारे १५ जूनला संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज फोल ठरला असून, आता २३ जूनपासून मोसमी वारे महाराष्ट्रासह मध्य भारतात

सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने गुरुवारी वर्तवली.२३ जूनपासून महाराष्ट्रासह मध्य भारतात मोसमी पाऊस सुरू होण्यास पोषक वातावरण तयार होईल, अशी माहिती हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. २३ जूनपासून

महाराष्ट्रासह मध्य भारतात मोसमी पाऊस सुरू होण्यास पोषक वातावरण तयार होईल, अशी माहिती हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!