माय महाराष्ट्र न्यूज:मराठी चित्रपटसृष्टीतली ‘अप्सरा’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सध्या आपल्या पतीसोबत हनिमूनला गेली आहे. कुणाल बेनोडेकर याच्यासोबत तिने गेल्याच
आठवड्यात पुन्हा लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर ती दोघं मेक्सिकोमध्ये हनिमून एन्जॉय करत आहेत. काही दिवसांपासून ती आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून फोटोज शेअर करत आहे.
नुकताच तिने आपल्या पतीसोबतचा एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे.सोनालीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती आणि तिचा पती मेक्सिकोतल्या एका बीचवर असल्याचं दिसत आहे.
यामध्ये सोनाली बिकिनीमध्ये दिसत आहे, तर तिच्या पतीने गुलाबी रंगाचा एक शर्ट आणि शॉर्ट्स घातली आहे. हा व्हिडिओ ड्रोनने शूट केलेला आहे. यामध्ये सुरुवातीला ती दोघं कॅमेऱ्याच्या
अगदी जवळ आहेत, तर काहीच क्षणांमध्ये हे ड्रोन त्यांच्यापासून भरपूर उंचीवर जातं. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूचा समुद्रकिनारा, रिसॉर्ट आणि क्षितिजापर्यंत पोहोचलेलं
निळंशार पाणी असं विलोभनीय दृष्य आपल्याला दिसतं.या व्हिडिओला तिने ‘पॅराडाइज!’ अशी कॅप्शन दिली आहे. सोबतच कॅप्शनमध्ये तिने व्हिडिओ बनवणाऱ्या @murph_holbox
यांचे आभार मानले आहेत. तसंच आपल्या कॅप्शनमध्ये तिने हनिमून डायरीज असा हॅशटॅग वापरला आहे. तिच्या या पोस्टवर प्रार्थना बेहेरे, रसिका सुनिल अशा सेलिब्रिटीजनी कमेंट्स
केल्या आहेत. सोबतच, सोनालीच्या चाहत्यांनीही तिच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 30 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.