माय महाराष्ट्र न्यूज:हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यात वर्तवण्यात आली आहे.
सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, सांगली, सातारा, पुणे, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांत मुसळाधार तर कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
19 मे रोजी अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहे.दरम्यान, राज्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काल गुरुवारी राज्यात काही भागात विशेषत:
सांगली, सोलापूरात पावसाने दमदार हजेरी लावली. उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेले नागरिक सुखावले असले तरी शेतकरी
वर्गात विशेषत: द्राक्ष बागायतदारांमध्ये वादळी वा-यामुळे चिंता पसरली आहे.दरम्यान, लातूर जिल्ह्यातील हासेगाववाडी येथे (दि. 19) अंगावर वीज पडून एका शेतमजुराचा मृत्यू झाला.
ज्ञानेश्वर अंकुश कांबळे (वय 35) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.