माय महाराष्ट्र न्यूज:हभप इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनातून लिंगभेदाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्या वादानंतर इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात पोलिसात तक्रारीही दाखल झाल्या होत्या.
आता या प्रकरणी इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करा असे आदेश दिले आहेत.सम-विषम तारखेला शरीरसंबंध ठेवल्यास मुलगा-मुलगी होते
असं विधान इंदुरीकर महाराजांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर पोलिसात तक्रार दाखल केली होती. तसंच खालच्या कोर्टात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. पण सेशल कोर्टाने गुन्हा रद्द केला होता. सेशन कोर्टाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. यावर हायकोर्टात सुनावणी झाली.
आता हाय कोर्टाने इंदुरीकर महारांजांविरोधात गुन्हा दाखल करा असं म्हटलंय.या प्रकरणात गुन्हा दाखल करावा म्हणून प्रथम वर्ग न्यायालयात 156 (3) याचिका करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायालयाने दिले होते. मात्र सत्र
न्यायालयाने हा आदेश रद्द केला होत. या निर्णयाला याचिककर्त्याने खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना खंडपीठाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे आणि सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला आहे. त्यामुळं आता
खंडपीठाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय.सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा आणि विषम तारखेला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते असं विधान इंदुरीकर महाराजांनी केलं होतं. त्याविरोधात अंनिसने खटला दाखल केला होता. याप्रकरणी
जिल्हा सत्र न्यायालयात गुन्हा दाखल झाल्यानंतर इंदुरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. याविरोधात इंदुरीकर महाराजांनी खटला रद्द करण्यासाठी संगमनेरच्या जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. युक्तीवादानंतर हा खटला रद्द करत जिल्हा सत्र न्यायालयाने
इंदुरीकर महाराजांना दिलासा दिला होता. मात्र अंनिसने याविरोधात औंरगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यानंर आता खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करत इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे आता इंदुरीकर महाराज यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.