माय महाराष्ट्र न्यूज: कोरोनानं अनेकांचे घरसंसार, आयुष्य उद्ध्वस्त केली. अनेकांनी आपले जीवलग गमावले. आपल्यापैकी बऱ्याचजणांना कोरोना होऊन गेला असेल. मात्र
काहीजण या कोरोनाच्या संसर्गातून वाचले. तुमच्यापैकी काहीजण त्यापैंकीच असू शकतील. सगळीकडे कोरोनाचा संसर्ग अगदी झपाट्याने होत असताना जर तुम्हाला कोरोनाचा संसर्ग
झालाच नसेल तर या मागचं नेमकं कारण काय आहे? एकतर तुमच्याकडे एखादी दिव्य शक्ती आहे का? किंवा या लाटेतही तुम्हाला संसर्ग झाला नाही यामागे काही शास्त्रीय कारण आहे का? की
केवळ तुमचं नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही वाचलात? ‘वेब दुनिया’ हिंदी वेबसाईटवर याबाबतची अधिक माहिती देण्यात आली आहे.ब्रिटनमध्ये एका वेळेस कमीतकमी 60 टक्क्यांपेक्षा
जास्त लोक कोविड पॉझिटिव्ह होते. अर्थात ही संख्या सार्स-कोव्ह-2 व्हायरसनं संसर्ग झालेल्या रुग्णांपेक्षा जास्त आहे. लक्षणं नसलेल्या संसर्गग्रस्तांची संख्या प्रत्येक अभ्यासाच्या आधारावर
वेगवेगळी असते. मात्र, हे सर्वासाधारण असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.मात्र, कोविड झाला आहे पण समजलंच नाही अशा लोकांचाही एक गट आहे. तर कोविड एकदाही झालाच नाही
अशा लोकांचाही एक गट आहे. संपूर्ण कोविड काळात चांगली रोगप्रतिकारक शक्ती असलेलेही काहीजण आहेत. त्यांच्याकडे बघून एक प्रश्न पडतो की त्यांना कोविड कसा झाला
नाही, हा प्रश्न संपूर्ण कोविड काळात अनुत्तरित आहे. असे अनेक प्रश्न या काळात अनुत्तरित राहिले आहेत.अशा लोकांकडे काही दिव्य किंवा दैवी शक्ती आहे का, हा प्रश्न आपण
फेटाळून लावू. पण या लोकांना कोविड न होण्यामागे विज्ञान आणि नशीब या दोन्ही गोष्टींचा हात असण्याची शक्यता आहे. एक साधी सरळ गोष्ट म्हणजे हे लोक थेट व्हायरसच्या संपर्कात
कधीही आलेले नाहीत. काही लोकांनी या महामारीच्या काळात संसर्ग होण्यापासून वाचण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले आहेत. गंभीर आजार किंवा हृदय, फुफ्फुसांच्या जुन्या आजारांसारखे जास्त
धोका असणाऱ्या लोकांसाठी मात्र ही काही वर्षे अत्यंत कठीण होती.भविष्यात व्हायरसमुळे होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी अनेकजण खबरदारी घेत आहेत. मात्र, खूप काळजी
घेऊनही अनेकजणांना कोविडचा संसर्ग झाला. समूह संसर्गाचा अत्यंत वेगाने फैलाव होत असल्यामुळे विशेषत: अत्यंत जलद अशा ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे कोविडचा संसर्ग होणार नाही
अशी शक्यता कमीच आहे. एखादी व्यक्ती शाळा किंवा अन्य कामांसाठी जाणाऱ्या लोकांना, खरेदी करणाऱ्या लोकांना भेटत असेल आणि या दरम्यान कोरोना संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात
ती आली नाही अशी शक्यता कमीच आहे. तसंच हॉस्पिटलमधील कर्मचारी किंवा कुटुंबातील अन्य व्यक्तींना कोरोना झाल्यानंतरही लागण झाली नाही असेही काहीजण आहेत.
लसीमुळे केवळ या गंभीर आजाराचा धोका कमी होतो असं नाही तर त्यामुळे सार्स कोव्ह-2 च्या घरगुती संसर्गाची शक्यताही जवळपास निम्मी होते.