Friday, July 1, 2022

मोठी बातमी:पेट्रोल साडे नऊ तर डिझेल तब्बल इतक्या रुपयांनी होणार स्वस्त; केंद्राची घोषणा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:वाढती महागाई आणि वाढत्या इंधन दराने होरपळणाऱ्या जनतेला केंद्राने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

आता केंद्राने इंधनावरील अबकारी कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे पेट्रोल वरील अबकारी कर प्रती लिटर ८ रुपये आणि डिझेल वरील

अबकारी कर ६ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल जवळपास ९.५० रुपये तर डिझेल ७ रुपयांनी स्वत होणार आहे. या बाबतची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केली.

गेल्या काही दिवसांमध्ये सतत इंधनात वाढ (Petrol Diesel Price) होत होती. त्यानंतर रशिया युक्रेनच्या युद्धामुळे देखिल इंधनामध्ये सतत वाढ होत होती. सततच्या इंधन दर वाढीमुळे

सामान्यांचे मात्र खिसे रिकामे होऊ लागले होते. याशिवाय महागाई देखिल वाढत होती. इंधन वाढ व वाढत जाणारी महागाई यामुळे त्रस्त झालेल्या जनतेला आज दिलासा देणारा निर्णय

केंद्राने घेतला. केंद्र सरकारने आज अबकारी कर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पेट्रोल वरील प्रती लिटर ८ रुपये तर डिझेल वर प्रती लिटर ६ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे आता पेट्रोल ९.५० रुपयांनी तर डिझेल ७ रुपयांनी कमी होणार आहे. त्यामुळे एकूणच सामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्राने या निर्णयाद्वारे केला आहे.वाढत्या इंधन

दरवाढी बरोबर जीवनावश्यक ठरणाऱ्या एलपीजी गॅसच्या दरांमध्ये देखिल मोठी वाढ सातत्याने होत होती. त्यामुळे घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरवर केंद्राने २०० रुपयांची

सबसिडी देण्याचा निर्णय यावेळी केंद्राकडून घेण्यात आला. अशा पद्धततीने केंद्राने इंधनावरील अबकारी कर कमी करत पेट्रोल डिझेलचे दर कमी केले. तसेच दुसरीकडे एलपीजी गॅसवर

देखिल सबसिडी देण्याचा मोठा निर्णय घेतला.केंद्र सरकारने पुढाकार घेत इंधनावरील अबकारी कर कमी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पेट्रोल डिझेलचे दर कमी झाल्यामुळे सामान्य

जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या आधी इतर राज्याने किंवा भाजपशासीत राज्यांनी त्यांच्या येथील इंधन दर कमी केले होते. तेव्हा केंद्राने महाराष्ट्र सरकारला इंधनावरील अबकारी कर

कमी करावे अशा सुचना केल्या होत्या. मात्र महाराष्ट्र सरकारने त्याबाबतीत कोणताही निर्णय घेतला नव्हता. आता केंद्राने अबकारी कर कमी केल्यामुळे महाराष्ट्र सरकार त्यांचा इंधनावरील

कर कमी करुन राज्यातील जनतेला आणखी दिलासा देणार का? हे पहावे लागेल.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!