Thursday, June 30, 2022

आंबे केमिकल वापरुन पिकवलेत की नाही हे असे ओळखा? ३ सोप्या ट्रीक्स

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आंबा हे वर्षातून एकदाच मिळणारे सगळ्यांच्या आवडीचे फळ. आता उन्हाळा संपत आला आणि पावसाचे वेध

लागायला सुरुवात झाली की मनभरुन आंबा खाऊन घेतला जातो. पुन्हा पुढच्या वर्षी येणारा हा आंबा भरपूर खरेदी केला जातो. फळांच्या या राजाचे भावही आता काही प्रमाणात उतरले आहेत.

आमरस, आंब्याच्या फोडी, चोखून खाल्ला जाणारा आंबा अशा वेगवेगळ्या रुपात आपण हा आंबा खात असतो. भरपूर पैसे देऊन खरेदी केले जाणारे हे फळ नैसर्गिकरित्या पिकवले आहे की रसायनांचा

वापर करुन हे कसे ओळखायचे असा प्रश्न अनेकदा आपल्या सगळ्यांसमोर असतो (Mango Buying Tips). कधी आपण आंबा खरेदी करताना फसवलेही जातो. मात्र आपली अशी फसवणूक होऊ नये

यासाठी आपल्याला काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. आंबा पिकवायला रसायनांचा वापर केला आहे हे कसे ओळखायचे पाहूया.

१. आपले आंबे जास्त प्रमाणात विकले जावेत यासाठी आंबा विक्रेते कच्च्या आंब्यांवर रसायने मारतात आणि ते पिकवून जास्त पैसे मिळवतात. आंब्यावर पांढऱ्या किंवा निळ्या रंगाचा डाग

असेल तर असा आंबा अजिबात खरेदी करु नये. कारण हे डाग रसायनांचे असू शकतात, त्यामुळे आंबा खरेदी करताना बारकाईने आंबे तपासून घ्या. नाहीतर ही रसायने आंब्याच्या माध्यमातून आपल्या पोटात

जाऊन आपले आरोग्य खराब होऊ शकते. तर अशाप्रकारे आपली फसवणूकही केली जाऊ शकते. २. आंब्यामध्ये रसायने आहेत की नाही

हे तपासायची आणखी एक सोपी पद्धत म्हणजे पाण्याचा वापर करुन आंब्यांची चाचणी करणे. यामुळे आंबे जबरदस्ती पिकविण्यात आले आहेत की नाही हे समजेल. यासाठी एका मोठ्या भांड्यात

पाणी घ्यायचे, त्यामध्ये आंबे ठेवायचे. हे आंबे पाण्यावर तरंगले तर ते केमिकल्सचा वापर करुन पिकवण्यात आले आहेत हे ओळखावे. असे आंबे तब्येतीसाठी अजिबात चांगले नसतात हे लक्षात घ्यायला हवे.

३. आंबे खरेदी करताना तो थोडासा दाबून पाहायला हवा. म्हणजे तो पिकलेला आहे की कच्चा हे आपल्याला ओळखता येते. हल्ली आपण बाजारातून कच्चे आंबे घरी आणतो. घरी नेल्यावर

४ ते ६ दिवसांत हे आंबे पिकतील असे आपल्याला सांगण्यात येते. मात्र १० दिवस उलटून गेले तरी हा आंबा काही केल्या पिकत नाही. त्यामुळे आपली फसगत होऊ शकते. त्यामुळे आंबे

खरेदी करताना ते खूप जास्त बिलबिले नसतील आणि प्रमाणाबाहेर कडक नसतील याची काळजी घ्यायला हवी.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!