Thursday, June 30, 2022

सावधान! आता ‘हा’ विषाणू ठरतोय जगासाठी डोकेदुखी, WHO ने दिला गंभीर इशारा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : कोरोनामुळे आधीच संकटात असलेल्या जगावर आता नवीन संकट निर्माण झाले आहे. सध्या मंकीपॉक्स या विषाणूंची

लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 10 दिवसात जगातील 12 देशांमध्ये या विषाणूची लागण झालेले 92 रुग्ण समोर आहे आहे. आफ्रिका, युरोपच्या 9 देशांसह अमेरिका,

कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात देखील मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) चिंता व्यक्त करत सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

आतापर्यंत एकूण 12 देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणं समोर आली आहेत. संक्रमणाचे गांभीर्य लक्षात घेत आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि आयसीएमआरला

परिस्थितीवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तज्ज्ञांच्या मते या विषाणूमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र WHO च्या म्हणण्यानुसार, मंकीपॉक्सच्या प्रकरणात वाढ

होण्याची शक्यता आहे. वेळेत उपाय योजना केल्यास मंकीपॉक्सचे वाढते संक्रमण रोखता येऊ शकते, त्यासाठी तात्काळ उपाययोजना करने गरजेचे आहे.WHO च्या म्हणण्यानुसार

मंकीपॉक्सचे पहिले प्रकरण लंडनमध्ये 5 मे 2022 रोजी समोर आले. एकाच परिवारातील 3 सदस्यांना या विषाणूची लागण झाली होती. यांची माहिती WHO ने 13 मे रोजी जाहीर केली होती.

अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचे प्रकरण आढळून आल्यानंतर आपल्या देशातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. भारतात येणाऱ्या आफ्रिकन नागरिकांची एअरपोर्टवरच तपासणी करत लक्ष

ठेण्यात येत आहे. गरज भासल्यास संशयितांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वयारोलॉजीमध्ये पाठविण्यात येऊ शकतात.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!