माय महाराष्ट्र न्यूज:एसटी महामंडळाच्या बससेवेसाठी आता प्रवाशांना एसटीचे तिकीट ऍपवर बूक करण्याचा पर्याय मिळणार आहे. या सुविधेला लवकरच सुरूवात होणार असून त्यामुळे प्रवाशांची वेबसाइटला येणाऱ्या समस्यांपासून सुटका होणार आहे.
याबाबत महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एका कार्यक्रमात माहिती दिली.एसटी महामंडळाचे तिकीट बुक करत असताना ही वेबसाइट अनेकदा बंद होते. तर कधी वेबसाइटवर तिकीट बुकिंग करताना अनेकदा
प्रवासांच्या खात्यातून पैसे कट होतात, मात्र, सीट मिळत नाही. खात्यातून गेलेले पैसे मिळविण्यासाठी ग्राहकांना खूप हेलपाटे मारावे लागतात. हेच नाही तर अनेक वेळेस तिकीट काढण्यासाठी आरक्षित जागा असलेल्या बसेस उपलब्ध नसतात. तर आपण बुक केलेल्या
तिकीटाचे नंबर अनेकदा बदलतात अशी तक्रारही प्रवाशांकडून करण्यात येते.या ऍपवर प्रवाशांना त्यांनी तिकीट आरक्षित केलेली बस नेमकी कुठे आहे? हेही तपासता येणार आहे. त्यामुळे बसची वाट पाहत राहणे बंद होणार आहे. तसेच प्रवाशांना आपली कामे
करून बसच्या वेळेत उपस्थित राहता येईल.या सुविधेसाठी राज्यातील 11 हजार बसमध्ये वाहन देखरेख प्रणालीचा वापर होणार आहे. एसटी महामंडळाकडून लॉंच करण्यात येणाऱ्या नव्या ऍपवर प्रवाशांना केवळ डेबिट-क्रेडिट कार्डवरूनच नाही, तर अगदी
त्यांच्या मोबाइलमध्ये उपलब्ध असलेल्या गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे यांच्या माध्यमातूनही पेमेंट करता येणार आहे.