Sunday, July 3, 2022

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील

यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘जो बूॅंदसे गई वो हौदसे नही आती’ अशी मार्मिक टिपणी त्यांनी केली. ते म्हणाले, ‘आधी आपल्या पक्षाच्या बगलबच्चांकडून वक्तव्य करून घ्यायची आणि नंतर

समाजाला गोंजारत बसायचे ही पवारांची जुनीच नीती आहे. त्यांच्या या भुलभूलैय्याला जनता भुलणार नाही,’ असा टोलाही विखे पाटील यांनी लगावला आहे.अहमदनगर जिल्ह्यातील

संगमनेरमध्ये विखे पाटील प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘ओबीसी आरक्षणाठी नेमलेल्या समर्पित आयोगाचे राज्यात प्रत्येक

महसूल विभागात सुरू असलेले दौरे म्हणजे केवळ फार्स आहे. दोन तासांच्या भेटीमधून आयोग नेमका कोणता डेटा गोळा करणारॽ वास्तविक ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत

आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात जाऊन माहिती संकलीत केली पाहिजे. मात्र आयोगाचे सदस्य फक्त एका महसूल विभागात जाऊन अवघ्या दोन तासात जर माहिती गोळा करणार असतील

तर यातून नेमका कोणता डेटा हाती लागणार? यापूर्वी मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेमलेल्या गायकवाड आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात जाऊन सुनावणी घेत नागरीकांचे म्हणणे जाणून घेतले होते, हे लक्षात घेतले पाहिजे’, असेही विखे पाटील म्हणाले.

केंद्राच्या निर्णयावर टिका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला काय दिले? हे एकदा तरी सांगावे. सर्वच गोष्टी केंद्राने करायच्या मग तुमचे योगदान कायॽ निर्णय फक्त मुंबई पुरते घेतले.

मुंबई सोडून मुख्यमंत्र्यांना जनताच दिसत नाही. केंद्राने आतापर्यत दोनदा पेट्रोल आणि डिझेलवर कर कपात केली. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांनीही तसे निर्णय घेऊन जनतेला दिलासा दिला.

तुम्ही एकदा तरी करून दाखवा,’ असे थेट आवाहनच विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!