माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं
वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा प्रकार दिसून आला आहे. या व्यक्तीतील लक्षणं मात्र सौम्य प्रकारची आहेत. Indian SARS-CoV-2 Consortium on Genomics या संस्थेनेही माहिती दिलेली आहे.
तर BA.4 या प्रकारचे दोन रुग्ण आढळले असल्याची माहितीही या संस्थेने दिली आहे.BA.4 आणि BA.5 या ओमायक्रॉनच्या दोन उपप्रकारांमुळे दक्षिण आफ्रिकेत कोरोनाची
पाचवी लाट आली होती. त्यानंतर हा विषाणू युरोपमधील विविध देशांत आणि अमेरिकेतही दिसून आला होता. जागतिक आरोग्य संघटनेने या दोन्ही विषाणूंच्या प्रकारांना व्हॅरिएंट ऑफ कन्सर्न
जाहीर केलेले आहे. या व्हॅरिएंटमुळे आफ्रिकेत रुग्णांना हॉस्पिटमध्ये भरती करावे लागणे आणि मृत्यू ओढवण्याचे प्रमाण अत्यंत अल्प राहिले आहे. त्यामुळे भारतातही या कोरोनाच्या
या व्हॅरिंएटमुळे भारतात गंभीर स्थिती ओढवणार नाही, असे तज्ज्ञांचं मत आहे. भारतात झालेले लसीकरण आणि तिसऱ्या लाटेत झालेला ओमायक्रॉनच्या BA.1 आणि BA.2 या दोन उपप्रकरांचा
संसर्ग लक्षात घेता नागरिकांत हायब्रीड प्रकारची इम्युनिटी आलेली आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.इतर देशांतील ४ महिन्यांचा अनुभव आपण पाहिला आहे. या व्हॅरिएंटमुळे गंभीर आजारी
पडणे, हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागणे आणि तसेच मृत्यू ओढवणे असे प्रकार घडलेले नाहीत. भारतातही गंभीर परिस्थिती ओढवेल असे वाटत नाही. भारतात लसीकरण मोठ्या प्रमाणावर
झाले आहे तसेच अनेक नागरिकांना कोरोनाची लागण होऊन गेलेली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असे INSACOG चे प्रमुख सुधांशू व्रती यांनी म्हटले आहे.