Sunday, July 3, 2022

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व

निर्माण करण्यासाठी ‘जिल्हा विकास आघाडी’चा प्रयोग राबवला होता. काँग्रेसमधीलच ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख विरुद्ध अपक्ष विखे असा ऐतिहासिक निवडणूक खटला आणि ज्येष्ठ

नेते शरद पवार यांच्याशी निर्माण झालेल्या विखे यांच्या राजकीय वैमनस्याची सुरुवात, अशी सर्व पार्श्वभूमी त्याला होती. आता विखे यांचा भाजपमध्ये खासदार असलेले नातू डॉ. सुजय

विखे आता तोच ‘जिल्हा विकास आघाडी’चा प्रयोग पुन्हा राबवू पाहत आहेत.अलिकडेच विखे फाउंडेशनच्या विळद घाटातील कार्यक्रमात बोलताना खासदार विखे यांनी जिल्हा विकास

आघाडीचा प्रयोग करण्याचा मनसुबा बोलून दाखवला. नगर जिल्ह्यात पक्षीय व पक्षविरहित अशा दोन पद्धतीने राजकारण चालते. जुन्या काळातही जिल्हा विकास आघाडी स्थापन करून

निवडणूक लढवल्या गेल्या होत्या. अनेकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे बंधन नको असते. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आली असली तरी स्थानिक पातळीवर

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये एकमेकांशी पटत नाही. नगर शहर, पारनेर या ठिकाणी राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येण्यास तयार नाहीत. इतरही तालुक्यात अशीच परिस्थिती आहे.

काही ठिकाणी काही लोकांना भाजपबरोबर जायचे नाही. अशा परिस्थितीत निवडणूक ताकदीने लढवण्यासाठी आणि भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी, असा प्रयोग करावा लागेल

अशी सुजय विखे यांची मांडणी आहे. मात्र, त्यासाठी पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची संमती महत्त्वाची असणार आहे.

आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजप प्रदेशच्या प्रमुख नेत्यांना प्रत्येकी दोन जिल्ह्यांचे प्रभारी करण्यात आले आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नगर जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

फडणवीस यांचा नगर दौरा अलीकडे दोनदा पुढे ढकलला गेला. आता पुन्हा जिल्हा भाजपच्या पातळीवर त्यांच्या दौऱ्याचे नियोजन सुरू आहे. या दौऱ्यात खासदार विखे यांच्या

 मनसुब्यावर चर्चा घडवून आणण्याचे काही पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न आहेत. मात्र, खासदार विखे यांच्या या मनसुब्याने जिल्हा भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. विखे भाजपमध्ये

असले तरी त्यांचे जिल्ह्यातील अनेक समर्थक अद्याप राजकीयदृष्ट्या विखुरलेल्या स्थितीत आहेत.या सर्व घडामोडींवर भाजप उपाध्यक्ष राम शिंदे यांनी सावध पवित्रा घेतला आहे.

जिल्हा विकास आघाडीच्या प्रयोगाची खासदार विखे यांची वैयक्तिक भूमिका असेल. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. पक्षामध्ये अशा पद्धतीने निर्णय होत नाहीत. जिल्हा विकास आघाडी स्थापन करण्याबाबत

जिल्हा भाजपच्या समितीमध्येही अद्याप चर्चा झालेली नाही, समितीपुढे विषयही आलेला नाही. अशा धोरणात्मक निर्णयांना प्रदेश समितीची संमती आवश्यक असते, अशा सूचक शब्दांत राम शिंदे

यांनी खासदार सुजय विखे यांना वाटले म्हणून अशी आघाडी होणार नाही, असे सूचित केले आहे. त्यामुळे नगरमध्येही मूळ भाजपचे नेते व गेल्या काही काळात भाजपमध्ये आलेले स्थानिक

प्रभावशाली नेते यांच्यात एकप्रकारे शीतयुद्ध सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!