माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली आहे. थॅलेसेमिया या गंभीर रक्ताच्या आजाराशी तोंड देत असताना या चिमुकलीला कुठल्यातरी रक्तपेढीतून मिळालेल्या
रक्तातून ‘एचआयव्ही’चा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकारामुळं चिमुकलीच्या नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून कारवाईची मागणी केली आहे. नागपुरात
झालेल्या प्रकारावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.नागपुरात एका तीन वर्षाच्या चिमुकलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा
प्रकार समोर आला आहे. दरम्यान, तीन वर्षीय चिमुरडीला थॅलेसेमिया आजार आहे, त्यामुळं वारंवार रक्त द्यावं लागतं. रक्तपेढीतील रक्तामुळं मुलीला एचआयव्हीचा संसर्ग झाला आहे.
या प्रकारामुळं चिमुरडीच्या नातेवाईकांकडून रक्तपेढींच्या गलथान कारभारावर संताप व्यक्त केला आहे. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी झालेल्या प्रकारावर प्रतिक्रिया दिला आहे.
‘या प्रकरणाची चौकशी करुण दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.दरम्यान, थॅलेसेमिया आजारामुळे या तीन वर्षीय
चिमुकलीला वारंवार रक्त द्यावं लागतंय, सरकारकडून थॅलेसेमियाच्या रुग्णांना खासगी आणि सरकारी रक्तपेढीतून मोफत रक्त देण्यात येतेय. परंतु हे रक्त ‘नॅट टेस्टेड’ नसल्याने थॅलेसेमियाच्या
रुग्णांना ‘एचआयव्ही’धोका निर्माण झाला आहे. या तीन वर्षांच्या चिमुकलीला आठ महिन्यांपूर्वी मुलीला ‘एचआयव्ही’ झाल्याचे निदान झाले आहे. आधीच थॅलेसेमियाचा गंभीर आजार, त्यात
एचआयव्ही’चा संसर्ग झाल्याने तिच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नागपुरातीलच थॅलेसेमियाग्रस्त चार मुलांना रक्तातून ‘एचआयव्ही’चा संसर्ग झाल्याचीही माहिती आहे. या प्रकरणाची
चौकशी करुण दोषींवर कारवाई करण्याचे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.