माय महाराष्ट्र न्यूज :खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे. मात्र, यंदा मान्सून नियमित वेळेच्या चार ते पाच दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झाल्याने मान्सूनची गतीही तशीच राहणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी सलग तीन ते चार दिवस पाऊस हाेऊन जमिनीत ओल हाेऊन द्यावी. सरासरी ८० ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.नगर जिल्ह्यात
सरासरी साडेचार ते पाच लाख हेक्टरवर खरीप हंगामातील पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खते, बियाणे आदींचे नियोजनही कृषी विभागाने केले आहे.कृषी विभागाच्या धाेरणानुसार सरासरी ८० ते १०० मिलीमीटर पाऊस झाला, तर वातावरणातील
आद्रतेने पिकांची उगवण क्षमता वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी.