Saturday, July 2, 2022

मान्सूनचा प्रवास लांबला

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:यावर्षी मान्सून लवकर दाखल होणार असल्यामुळे देशवासियांना खूप आनंद झाला होता. पण आता नुकताच आलेल्या माहितीनुसार मान्सूनचा प्रवास लांबला आहे.

कारण मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला असला तरीही तिथेच त्याने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मान्सून उशिराने दाखल होणार आहो.

अरबी समुद्रापर्यंत पोहचलेल्या मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे आता त्याचे आगमन दोन दिवसांनी लांबणीवर गेले आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये

दाखल होणार आहे. त्यानंतर हळूहळू पुढे सरकत मान्सून 5 जूनला कोकणात आणि 7 जूनला मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तवली आहे.

याआधी मान्सून मुंबईत 5 जूनला दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली होती. त्यामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना खूप आनंद झाला होता. पण आता

मान्सून मुंबईमध्ये दोन दिवस उशिराने दाखल होणार आहे. कारण मान्सूनसाठी पूरक परिस्थिती नसल्याचे दिसत आहे. 10 ते 16 जूनदरम्यान मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळात दाखल होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 3 ते 9 जूनमध्ये मान्सून

दाखल होईल. 7 जूनला मान्सून मुंबईत दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे आता सर्वांना मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!