Friday, July 1, 2022

महाराष्ट्रात या तारखेपासून कपाशी बियाणे उपलब्ध होणार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शासनाचे निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक यांनी राज्यातील शेतकर्‍यांना कपाशी बियाणे पुरवठा करण्याचा कालावधी निश्चित केला

असून शेतकर्‍यांना लागवडीसाठी 1 जून पासून बियाणे उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.राज्यात शेतकरी नगदी पिक म्हणून कपाशीला पसंती देतात. चालू वर्षी

ऊस पिकामध्ये शेतकर्‍यांना साखर कारखान्यांकडून तोडीबाबद आलेल्या वाईट अनुभवामुळे यंदा शेतकरी मोठ्या संख्येने कापूस पिकाकडे वळणार आहे. याचा अंदाज बांधून कृषि

विभागाने नियोजन केले आहे. ज्या शेतकर्‍याकडे पाणी उपलब्ध आहे, ते शेतकरी हंगाम पूर्व लागवड करतात, त्यासाठी लागवडही वेळेत व्हावी म्हणून शेतीची मशागत करून ठेवली आहे.

शेतकरी हंगाम सुरु होण्यापूर्वीच कपाशी लागवडीची लगबग करतात. त्यामुळे कपाशीवरील शेद्री बोन्ड आळीचा जीवन क्रम खंडित होत नाही. परिणामी शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसतो.

त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण यांनी बियाणे पुरवठा करण्याचा कालावधी निश्चित केला आहे. त्यनुसार उत्पादक कंपन्या व विक्रेते यांना निर्देश देऊन शेतकर्‍यांना बियाणे

एक जून पासून लागवडीस उपलब्ध करावेत अशा सूचना परिपत्रक काढून दिल्या आहेत.सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधित बियाणे उत्पादक कंपनी, बियाणे वितरक, किरकोळ विक्रेते

यांच्यावर महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत. त्या नुसार नेवासा तालुका कृषि विभाग, पंचायत कृषि विभागाकडून

तालुक्यात भरारी पथक कार्यरत झाले आहे, तसेच गावापातळीवर कृषि केंद्रनिहाय कृषि सहायकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या असून उल्लंघन होऊ नये म्हणून लक्ष ठेऊन आहेत.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!