भेंडा:राहुल कोळसे:यंदाच्या हंगामात कारखान्याचे जास्तीत जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे.सर्व शेतकरी कारखान्याला नेहमीच सहकार्य करतात तसेच पुढे सर्वांनी योगदान दिले पाहिजे असे मत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील
कौठे – मलकापूर येथील श्री गजानन महाराज शुगर कारखान्याच्या २०२३ -२४ गळीत हंगामासाठीचा रोलर पूजनाचा कार्यक्रम कारखान्याचे संस्थापक चेअरमन रवींद्र बिरोले यांच्या शुभहस्ते विधीवत पूजन शुक्रवारी दि 16 जून रोजी पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
कारखान्याच्या आगामी सन 2023-24 च्या गळीत हंगामासाठीची हंगामपूर्व मशिनरी दुरुस्ती व देखभालीची कामे प्रगतीपथावर आहेत. यंदाचा गळीत हंगाम निर्धारीत वेळेत सुरू व्हावा, यादृष्टीने कारखाना व्यवस्थापन योग्य ती खबरदारी घेत आहे. मशिनरी
देखभाल व दुरुस्तीसाठीची योग्य ती व्यवस्थाही करण्यात आली आहे. हंगामपूर्व कामासाठी कालबध्द कार्यक्रम आखण्यात आला असून त्यानुसार संबंधित अधिकारी व कर्मचारी अंमलबजावणी करीत आहेत.यंदाच्या हंगामात कारखान्याचे जास्तीत जास्त ऊस
गाळपाचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी कारखान्याला ऊस देण्यासाठी आग्रही असतात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळतो वेळेत पेमेंट मिळतात त्यामुळे शेतकरी कारखाना प्रशासनावर आनंदी आहे . येणाऱ्या गाळप हंगामात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस देऊन सहकार्य करावे.कारखाना दुरुस्तीची कामे युद्ध
पातळीवर सुरू आहेत.येत्या हंगामात डिस्टलरी प्रकल्प चालू होत आहे. येणारा गळीत हंगाम योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने सर्व संचालक मंडळ व आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास कारखान्याचे चेअरमन रवींद्र बिरोले यांनी व्यक्त केला.
यावेळी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक शंतनु बिरोले, जनरल मॅनेजर राजेंद्र काळे, संचालक हरीभाऊ गिते, सुभाष कोळसे,चिफ इंजिनिअर श्री वाकचौरे ,कारखान्याचे फाईनासं मॅनेजर रनवरे , लिगल ऑफिसर मंडलिक ,सिव्हिल इंजिनिअर श्री डहाळे ,
शेतकी अधिकारी राजेंद्र चिंधे,सुरक्षा अधिकारी श्री फारुकी व सर्व अधिकारी, कर्मचारी वृंद व शेतकरी बांधव उपस्थित होते