Saturday, July 2, 2022

मी मेल्यावर बारामतीचा हा गडी कसा आला हे ब्रम्हदेवाला विचारणार : पवारांवर निशाणा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील वाढती जातीय तेढ आणि ब्राह्मण विरोधक असा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रसने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ब्राह्मण

संघटनांची पुण्यात बैठक घेतली होती. त्यानंतर ब्राह्मणविरोधी वक्तव्याला पाठिंबा नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यावेळी ब्राह्मण समाजाच्या आरक्षणावारुनही शरद पवारांनी भाष्य केले होते.

याबाबत बोलताना रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आटपाडी शेतकरी मेळाव्यात खोत बोलत होते.ब्राह्मण समाजाने

आरक्षण मागितले नव्हते पण शरद पवारांनी ट्विट केले की दुसऱ्याच्या आरक्षणाला तुम्ही विरोध करु नका असे म्हटले. पण ते असे म्हणालेच नव्हते. मी मेल्यावर बारामतीचा हा गडी कसा

आला हे ब्रम्हदेवाला विचारणार आहे. हा गडी एवढा हुशार झालाच कसा? यांच्यामध्ये कोणते स्पेअरपार्ट घातले हेही ब्रम्हदेवाला विचारणार आहे. मला वाटतं ब्रम्हदेवाला चुकवून ते खाली

पळाले असणार. एवढा बिलंदर माणूस राजकारणात कधीही मिळणारा नाही. या महाराष्ट्राला लुटण्याचे काम या मंडळींनी केले आहे. म्हणून मी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती करतो की आपल्याला हे सरकार

घालवायचे आहे असे सदाभाऊ खोत म्हणाले.या वर्षी हर्बल गांजा पेरायला हवा. कारण हर्बल गांजाला परवानगी देण्यात आली आहे. नवाब मलिकांच्या जावयाकडे गांजा सापडल्यानंतर

तो हर्बल तंबाखू असल्याचे सांगितले. त्यामुळे आपण एकमुखाने मागणी करुया की हर्बल तंबाखूचे बियाणे द्या त्यामुळे आमची गरिबी तरी जाईल. कारण तुम्ही आम्हाला काही देऊ शकत नाही.

जो कोणी बोलतो त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन जेलमध्ये टाकले जाते, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.आमच्या नादाला कशाला लागत आहात आम्ही फाटकी माणसं आहोत. आमचं काही जात नाही

आमच्या मागेपुढे काही नाही. आमच्या नादी लागू नका. आम्ही आधीपासून नागडे आहोत पण तुम्हाला चौकात नागडे केल्याशिवाय सोडणार नाही हे लक्षात ठेवा असाही इशारा खोत यांनी दिला.

शरद पवार हे हुशार आहेत हे मान्य केल्याबद्दल सदाभाऊ खोत यांचे आभार. शरद पवार हे कोणत्या स्पेअरपार्टने बनले आहेत हे तुम्हाला कधीच कळू शकणार नाही. कारण तुमची नजर द्वेषाची आहे.

प्रेम, सेवा, कतृत्व, दूरदृष्टी या स्पेरअपार्टने शरद पवार घडले आहेत हे महाराष्ट्रातील सामान्या माणूस सांगेल. त्यामुळे तुम्हाला अनेक जन्म घेतले तरी शरद पवार कळणार नाहीत असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!