Thursday, June 30, 2022

मोठी बातमी:आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा रद्द; लवकरच नव्याने होणार परीक्षा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड पदांसाठी झालेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाल्याने या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आरोग्य

विभागाने घेतला आहे. तसेच या परीक्षा येत्या काही महिन्यात ‘TCS’किंवा ‘MKCL’ या संस्थांमार्फत घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील 2739 आणि गट ड संवर्गातील 3466 अशा एकूण 6205 पदांच्या भरतीसाठी सरळसेवा परीक्षा झाल्या होत्या.

परंतू परीक्षांमध्ये झालेला गोंधळ पाहता ही भरती प्रक्रीया रखडली आहे.या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार होत्या परंतू नियोजित तारखेच्या काही तास आधीच ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

नंतर ऑक्टोबरमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. या दोन्ही परीक्षांचे पेपर आधीच फुटल्याचे पोलिसांच्या तपासाअंती स्पष्ट झाले.परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल़्यानंतरही आरोग्य विभाग ठोस

निर्णय घेत नसल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यामुळे या दोन्ही संवर्गाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. या दोन्ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!