Saturday, September 23, 2023

अत्यंत महत्त्वाची बातमी:मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदतवाढ…..

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढवलीआहे. आता आधारमध्ये

14 सप्टेंबर 2023 पर्यंत दस्तऐवजांचे मोफत करता येणार आहे. तुम्ही तुमच्या ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा दस्तऐवज 14 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाइन मोफत अपडेट आणि अपलोड करु शकता. पूर्वी ही तारीख 14 जून 2023 होती.

आता तुमच्याकडे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तीन महिने आहेत. जे तुम्ही ऑनलाइन अपडेट करू शकता. UIDAI ने माहिती दिली आहे की तुम्ही 14 सप्टेंबरपर्यंत ओळखपत्र आणि अ‍ॅड्रेस प्रूफ अपलोड करु शकता.

UIDAI वेबसाइटनुसार आधार कार्डची माहिती अचूक ठेवण्यासाठी तुमचे डेमोग्राफिक डॉक्युमेंट अपलोड करु शकता. आताच तुमचे आधार कार्ड अपडेट करा. तुमचे आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी तुम्ही https://myaadhaar.uidai.gov.in

ला भेट देऊ शकता. यासोबतच सीएससी केंद्रावर जाऊन अपडेट करण्यासाठी 25 रुपये चार्ज भरावे लागेल.UIDAI ने जारी केलेल्या या पोर्टलवर आधार कार्डमध्ये पत्ता, नाव इत्यादी माहिती अपडेट केली जाऊ शकते. यासाठी यूझर्सला आधार

नंबर आणि मोबाइल नंबर आवश्यक आहे. मोबाईल नंबरवर OTP द्वारे तुम्ही पत्ता आणि इतर गोष्टी बदलू शकता.सर्वप्रथम आधारची वेबसाइट myaadhaar.uidai.gov.in वर जा. आता लॉग इन करा आणि नाव, जेंडर, जन्मतरीख आणि अ‍ॅड्रेसचा पर्याय निवडा. आधार

अपडेटचा ऑप्शन निवडा. आता पत्ता किंवा इतर माहिती अपडेट करण्यासाठी ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर स्कॅन कॉपी अपलोड करा आणि डेमोग्राफिक डेटा माहिती अपलोड करा. आता पेमेंट करा, त्यानंतर तुम्हाला एक नंबर मिळेल. हा नंबर सांभाळून ठेवा.

स्टेटस चेक करण्यासाठी फायदेशीर ठरेल.जेव्हा तुम्ही आधार कार्डमध्ये पत्ता बदलण्याची रिक्वेस्ट सबमिट करता तेव्हा तुम्हाला एक URN नंबर दिला जातो. तो तुमच्या स्क्रीनवर दिसेल आणि तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे पाठवला जाईल.

आता तुम्ही https://ssup.uidai.gov.in/checkSSUPStatus/checkupdatestatus वर जाऊन तुमच्या आधार कार्ड अपडेट स्टेटसला ट्रॅक करु शकता.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!