माय महाराष्ट्र न्यूज:ओडिशाच्या बारगढ जिल्ह्यातील (Odisha bargadh district) एका शेतकऱ्याने (farmer) जगातील सर्वात महागड्या आंब्यांमध्ये गणल्या जाणार्या आंब्याच्या
प्रजातीचे झाड मोठे केले आहे. दरम्यान या आंब्याला बाजारात लाखो रुपये किलो असा दर असतो. ओडिशातील बारगढ जिल्ह्यातील निलाथर गावातील शेतकरी चंदू सत्य नारायण
यांनी हा आंबा पिकवण्यात यश मिळवले आहे. मियाझाकी या जातीचा महागडा आंबा सेंद्रिय पद्धतीने पिकवण्यात सत्य नारायण यांना यश आले आहे.सर्वसाधारण बाजारात आंब्याची
किंमत अडीच ते तीन लाख रुपये किलोने विकला जातो. दरम्यान सत्य नारायण यांनी सरकारकडे हा आंबा खपवण्याची मागणी केली आहे. ओडिशाच्या एका खेडेगावात जन्मलेल्या
सत्य नारायण यांचे प्राथमिक शिक्षण ही पूर्ण झाले नाही. ते सध्या 50 वर्षांचे आहेत. त्यानी हा आंबा बांगलादेशातून आणल्याचे सांगितले.दरम्यान त्याचे संगोपन चांगल्या पद्धतीने केल्याने
त्यांना हे यश आल्याचे ते सांगतात. हा आंबा पिकवण्यात यश मिळाल्याचा त्यांना खूप आनंद आहे. मात्र झाडाला लागलेले 2 आंबे विकण्यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे.
सत्य नारायण हे बारगड जिल्ह्यापासून 130 किमी लांब असलेल्या नीलाथर गावात राहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांनी बांगलादेशातून मियाझाकी आंब्याच्या कोय आणल्या होत्या.
राज्याचे सहाय्यक कृषी संचालक वासुदेव प्रधान यांनी सत्य नारायण यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, एवढा महाग आंबा पिकवणारा राज्यात एकही शेतकरी नाही यांनी आपल्या
कौशल्यावर हा आंबा पिकवला आहे त्यांचे कौतुक करेल तेवढे कमी असल्याचे ते म्हणाले. तसेच मियाझाकी आंब्याच्या मार्केटिंगसाठी आवश्यक ती सर्व पावले आम्ही उचलत असल्याचे सांगितले.