माय महाराष्ट्र न्यूज:गर्भपाताच्या गोळ्याप्रकरणी परवाना रद्द झालेल्या श्रीराम एजन्सीच्या नावाने आलेला शक्तिवर्धक २० हजार गोळ्यांचा
साठा एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला. अन्न व औषध प्रशासनाने या गोळ्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. ५ मे रोजी एमआयडीसी
पोलिस व औषध प्रशासनाने सुमारे ९ हजार गर्भपाताच्या गाळ्यांचा साठा जप्त केला होता.याप्रकरणी श्रीराम एजन्सीचा मालक नितीन जगन्नाथ बोठे (रा. टीव्ही सेंटर, सावेडी) आणि आयव्हीए
हेल्थ केअर कंपनीच्या (पंचकूला, हरियाणा) संचालक मंडळाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात गर्भपाताच्या गोळ्या जप्त केलेल्या
ट्रान्सपोर्ट कंपनीत श्रीराम एजन्सीच्या नावे ‘वाइल्डमोर-१००’ या शक्तीवर्धक गोळ्या आल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. सहायक
निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी उपनिरीक्षक दीपक पाठक यांनी या २० हजार गोळ्यांचा साठा तपासकामी जप्त केला.