माय महाराष्ट्र न्यूज:यंदा आधीच मान्सूनला केरळमध्ये दाखल होण्यास उशीर झाला. मात्र, आता बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यात मान्सून आणखीच लांबणीवर पडला आहे. अशातच आता काही जिल्ह्यांमध्ये
पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.पुण्यात आज आकाश अंशतः ढगाळ राहणार असून अति हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.पुण्यात आज आकाश अंशतः ढगाळ राहणार असून अति हलका पाऊस
पडण्याची शक्यता आहेमुंबई, कोकणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत.काही जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ असल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळत आहे
आज कोकण, विदर्भात बहुतांशी ठिकाणी, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.17 जून आणि 18 जून रोजी नागपूर जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रात 23 जूनपासून मान्सूनचे पुनरुज्जीवन होत असल्याचे पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख होसाळीकर यांनी म्हटलं आहे .18 ते 22 जूनदरम्यान पुणे आणि मुंबईत मान्सून दाखल होऊ शकतो.