माय महाराष्ट्र न्यूज:भारतातील कॅश विड्रॉवल आणि डिपॉझिट करण्याच्या प्रणालीमध्ये आजपासून म्हणजेच 26 मे 2022 पासून बदल होणार आहेत.
एका आर्थिक वर्षात सहकारी बँका आणि पोस्ट ऑफिससह इतर बँक खात्यांमधून 20 लाखांपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी
पॅन किंवा आधार क्रमांक नमूद करणं सरकारनं अनिवार्य केलं आहे. हे नियम करंट अकाउंट उघडतानादेखील लागू होतील, असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने या महिन्याच्या सुरुवातीला एका
परिपत्रकाद्वारे जाहीर केलं आहे.प्रत्येक व्यक्तीने खालील तक्त्यातील स्तंभ (2) मध्ये नमूद केलेलं ट्रान्झॅक्शन सुरू करताना आणि अशा व्यवहाराशी संबंधित दस्तऐवजांमध्ये आपला
परमनंट अकाउंट नंबर किंवा आधार नंबर नोंदवणे आवश्यक आहे. वर दिलेल्या टेबलमध्ये कॉलम (3) मध्ये अंतर्भूत व्यक्तींपैकी ज्यांना हे डॉक्युमेंट मिळेल त्यांनी त्यातील नंबर अर्जात
लिहावा आणि ऑथेंटिकेट करून घ्यावा असं सीबीडीटीनं 10 मेच्या परिपत्रकात म्हटलं आहे.स्तंभ 2 आणि 3 मध्ये, हे नियम कुठे लागू होतील आणि ज्या
व्यक्तींना हे पॅन आणि आधार क्रमांक मिळतात त्यांनी ते प्रमाणीकृत असल्याची खात्री कशी केली पाहिजे, याची माहिती देण्यात आली आहे.पूर्वी एका दिवसात 50 हजार रुपयांपेक्षा
जास्त रक्कम जमा करताना पॅन कार्ड आवश्यक होतं. नियम 114 बी नुसार रक्कम भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी कोणतीही वार्षिक मर्यादा नव्हती. याशिवाय, ही मर्यादा फक्त बँकेत ठेवलेल्या ठेवींवर लागू होती.
सेक्शन 139 ए नुसार, ऑथेंटिफिकेशनसाठी एखाद्या व्यक्तीच्या डेमोग्राफिक आणि बायोमेट्रिक माहितीसह पॅन किंवा आधार कार्ड, प्रिन्सिपल डिरेक्टर जनरल ऑफ इन्कम टॅक्स (सिस्टिम्स) किंवा
डिरेक्टर जनरल ऑफ इन्कम टॅक्स (सिस्टिम्स) यांच्याकडे किंवा त्यांनी नेमणूक केलेल्या व्यक्तीकडे पाठवला गेला पाहिजे.कलम 139ए अशा व्यक्ती किंवा ट्रान्झॅक्शन्स नमूद करते ज्यांनी
पॅनसाठी अर्ज आणि कोट केला पाहिजे. मात्र, त्यात सर्व प्रकारच्या व्यक्ती आणि ट्रान्झॅक्शन्सचा समावेश होऊ शकत नसल्यामुळे, ही प्रक्रिया केंद्र सरकारकडे सोपवण्यात आली आहे.
त्यामुळे सीबीडीटी असे ट्रान्झॅक्शन्स आणि व्यक्तीची माहिती देऊ शकते.सीबीडीटीने या परिपत्रकाद्वारे, बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेचा भरणा किंवा
पैसे काढण्याचे व्यवहार विहित करण्यात आले आहेत, असं टॅक्सबडी डॉट कॉमचे संस्थापक सुजित बांगर म्हणाले.