Saturday, July 2, 2022

छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांच्या पतसंस्थेला नऊ कोटीचा नफा- सुदाम बनसोडे

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांच्या पतसंस्थेला या आर्थिक वर्षात सुमारे नऊ कोटीचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुदामराव बनसोडे यांनी दिली.

अधिक माहिती देताना श्री.बनसोडे म्हणाले की, छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांच्या पतसंस्थेची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 28 मे रोजी श्री क्षेत्र देवगड येथे होत आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाल्या नंतर आपण संस्थेचा प्रगती आलेख उंचाविण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. १० जून २०२०पासून या संस्थेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली . तेव्हापासून ते ३० एप्रिल २०२२ अखेरपर्यंत संस्थेचे एकूण ठेवीत ५५ कोटी ८३ लाख २६ हजार ३५८ एव्हढ्या ठेवी वाढल्या आहेत. पूर्वी संस्थेच्या ठेवी ३० कोटी ४१ लाख ८८ हजार ५३ एव्हढ्या होत्या. आता त्या ८६ कोटी २५ लाख १४ हजार ४११ झालेल्या आहेत. संस्थेचे सध्याचे भाग भांडवल रुपये चार कोटी ७१ लाख २० हजार ८३८ आहे. रिझर्व्ह फंड दोन कोटी १७ लाख ४४ हजार ७४५ आहे.

 

उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्वे म्हणाले की, संस्थेचे कार्यालय सीसीटीव्ही युक्त असून संचालक मंडळाचे थेट मोबाईलवर संस्थेचे कामकाज दिसून येते व संस्थेला आयएसओ मानांकन प्राप्त आहे. हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे.

संस्थेचे मानद सचिव चंद्रकांत तापकीर यांनी सांगितले की, सर्व सभासदांचा २० लाखाचा अपघात विमा उतरविण्यात आलेला आहे. संस्था स्वभांडवली करण्याच्या दृषटीने एक पाऊल पुढे टाकीत कायमठेवीत दरमहा रुपये एक हजाराने वाढ करण्यात आली आहे. कुटुंब आधार योजना सुरू करण्यात आली आहे व सभासदांना ई पासबुक सुविधा देण्यात आलेली आहे.

संस्थेची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 28 मे रोजी श्री क्षेत्र देवगड येथे होत आहे.या सभेला दादासाहेब डौले, प्रमोद कानडे, सुरेश मंडलिक, दादासाहेब शेळके, सुरेश खरड, प्रशांत सातपुते, सुनीता बर्वे, किशोर जेजुरकर, राजेंद्र बागले, अर्चना कडू, रामदास जाधव, जयराम ठुबे, संजय गवळी, बाळासाहेब मेहेत्रे, संजय गिऱ्हे, अरुण गाढवे, अशोक जगदाळे, तुळशीराम दिनकर आदींसह सर्व सभासद उपस्थित राहणार आहेत.

ठेवीत 56 कोटींची वाढ…

या कारकीर्दीत 56 कोटी रुपयांच्या ठेवी वाढल्या आहेत .या वर्षी सभासदांना कायम ठेवी वर रुपये दोन कोटी पाच लाख ,लाभांश रुपये६६ लाख ८१ हजार आणि व्याज रिबेट रुपये ९५ लाखअसे एकूण 3 कोटी 66 लाख रुपये सभासदांना वाटप करण्यात येत आहे.
सुदाम बनसोडे (अध्यक्ष)

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!