भेंडा(नेवासा)
नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील कै.नामदेवराव नवले पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी रवींद्र काशिनाथ नवले तर दशरथ जमन मापारे यांची निवड झाली आहे.
यावेळी नवनिर्वाचित संचालक अर्जुन बाजीराव नवले,राधाकिसन तुकाराम भागवत,गोरक्षनाथ सुखदेव नवले,रोहन विजयकुमार नवले,मच्छिंद्र सखाराम धनवडे, गणेश मच्छिंद्र नवले, गोरख दगडु चौधरी,मच्छिंद्र रुस्तुम शिंदे, रुपाली गणेश नवले,गंगुबाई बाजीराव मोरकर,दामु रंगनाथ महापुर उपस्थित होते.
निवडणूक अधिकारी म्हणून पी.के. खेडेकर व सचिव गणेश भुजबळ यांनी पाहिले.
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख,माजी आमदार नरेंद्र घुले पाटील,माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,माजी आमदार पांडुरंग अभंग,संचालक काशिनाथ नवले,विजयकुमार नवले यांनी अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.