भेंडा: राहुल कोळसे:भारत राष्ट्र समिती पक्षाच्यावतीने(BRS) राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर नांदेड येथे आयोजित करण्यात आले होते.
बीआरएस पक्षाला राष्ट्रीय स्थरावर वाढवण्यासाठी के. चंद्रशेखर राव यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
हे सर्व सुरू असताना पक्ष सोशल मीडियावर चांगले लक्ष केंद्रित केले आहे.यासाठी पक्षाने जयंत भरत देशमुख यांची सोशल मीडियाच्या राष्ट्रीय प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. जयंत देशमुख यांनी याआधी आम आदमी पार्टी पक्षाचे काम जबरदस्त पद्धतीने केले आहे.
त्यांच्या या कामाची दखल खुद्द भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष व तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी घेतली व जयंत देशमुख यांची चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. देशमुख यांना खांद्याला खांदा देत उदयराव घाटगे ,
शशीकांत ससाणे , प्रकाश चव्हाण , चिन्मय जोशी आणि इतर सर्व सोशल मीडिया टीम चे पदाधिकारी दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत.अवघ्या पंधरा दिवसांमध्ये देशमुख यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियाचे नेटवर्क तयार केलेले असून जिल्हास्तरीय टीम स्थापना केलेल्या आहेत.
यामध्ये तरुणांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्यक्तीचा योग्य पद्धतीने मुलाखती घेऊन त्याची स्क्रीनिंग करून त्यांना सोशल मीडिया टीम मध्ये पॉईंट केलं जातं. अत्यंत पारदर्शक पद्धतीने चांगल्या लोकांची निवड या टीम मध्ये केली जात आहे. त्यामुळे बी आर एस
येत्या काळामध्ये सोशल मीडियामध्ये सगळ्यात मजबूत असा पक्ष म्हणून उभा होत आहे अशी आमची पक्की खात्री आहे.पक्षाचे ध्येय धोरणे हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी चांगली मेहनत घेत आहेत. तेलंगणा राज्यामध्ये सुरू असलेल्या विकास, योजना,
महिती, शेतकरी योजना तसेच अनेक बदल तेलंगणा मध्ये कसा के चंद्रशेखर राव यांनी केला आहे ती सर्व महिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज चालू आहे.रयथू बंधू, रायथू विमा, प्रत्येक घराघरात पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज योजना
यासारखे शेतकरीभिमुख कार्यक्रम महाराष्ट्रात राबविण्यात आलेले नाहीत, जे बीआरएस राबवण्याचे ध्येय ठेवत आहे याची महिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सोशल मीडिया टीम काम करत आहेत.
[ सोशल मीडियामुळे प्रत्येक घरात पक्ष जाणार
आम्ही व आमची टीम तेलंगणा मॉडेल कसे आहे ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी सोशल मीडियाचा चांगला पद्धतीने वापर करत आहेत. पक्ष नोंदणी यासंदर्भात आम्ही दररोज सोशल मीडिया वापर करत आहे.
सोशल मीडिया वापरामुळे आमच्याकडे अनेक तरुण व शेतकरी पक्षाकडे आकर्षित होत आहे.आम्ही पुढील काही दिवसांत सोशल मीडियावर अजून जास्त लक्ष देऊन भारत राष्ट्र समिती पक्ष गावपातळीवर घेऊन जाऊ.
लवकरच बी आर एस च्या सोशल मीडियाचे जाळे संपूर्ण देशात आम्ही वाढवणार आहोत आणि त्यासाठी संघटनात्मक तयारी सुरू झालेली आहे. येत्या काळामध्ये सर्वात सक्षम असा पर्याय म्हणून बी आर एस पक्ष देशांमध्ये निर्माण होईल आणि ते करण्यासाठी
सोशल मीडियाचा सकारात्मक पद्धतीने वापर केला जाईल असेही देशमुख यांनी म्हटले.
जयंत देशमुख
बीआरएस राष्ट्रीय प्रभारी सोशल मीडिया]