Saturday, July 2, 2022

शेतकऱ्यांसाठी खूशखबर लवकरच 50 हजारांचे अनुदान खात्यात जमा होणार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंतचे अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली. दरम्यान

पात्र शेतकऱ्यांची यादी ११ मे पर्यंत देण्याचे सहकार विभागाकडे देण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. या योजनेची स्पष्टता आल्यानंतर

संगणकीय प्रणाली पूर्ण होऊन पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान या सर्व बाबी लवकरच पूर्ण होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर पैसे जमा होणार आहेत.

नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी बँकांनी पाठवली असल्याने पुढच्या दोन आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळण्याची शक्यता आहे.महात्मा फुले

शेतकरी सन्मान योजनेत नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाची घोषणा करतानाच यंदाचे वर्ष महिला शेतकरी- शेतमजूर सन्मान

वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती.अर्थसंकल्प सादर करताना पवार यांनी, कृषी क्षेत्र हाच विकासाचा पाया आहे, यावर सरकारचा विश्वास आहे.

त्यामुळे या क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी ३ हजार कोटींची भरीव तरतूद केल्याचा दावा केला. तसेच हे वर्ष ‘‘महिला शेतकरी व शेतमजूर सन्मान

वर्ष’’ म्हणून राबविण्याची घोषणा करताना पवार यांनी महिला शेतकऱ्यांकरीता कृषी योजनांमध्ये राखीव असलेली ३० टक्के तरतूद वाढवून ५० टक्के करण्यात येईल. तसेच कृषी विभागाच्या

योजनांमध्ये यापुढे तरतुदीच्या ३ टक्के निधी आजी-माजी सैनिकांनाही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!