Friday, July 1, 2022

विखेंचे मोठे विधान: शरद पवारांनी उद्या भाजपचे ….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासंदर्भात ईडीने केलेल्या कारवाईवरून भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील

यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीने केलेल्या कारवाईबद्दल भाष्य करताना

विखे पाटील म्हणाले की, हे महाविकास आघाडी नाही तर हे महाभ्रष्टाचारी सरकार आहे. परिवहन मंत्र्यावर पडलेल्या छाप्याची गाडी किती दूर जाईल माहीत नाही, असे सूचक विधान विखे

पाटलांनी केले आहे. कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय इडीची कारवाई होत नाही. नवाब मलिकांच्या प्रकरणावरून हे सिद्ध झाले आहे. दाऊद इब्राहिमशी संबध असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे.

मात्र तरीही जाणते राजे म्हणताहेत माझा त्यांच्यावर विश्वास आहे. अतिरेकी कारवाईचे समर्थन केले जात आहे, हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे, अशी घणाघाती टीका विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.

ज्ञानवापी मशीद आणि मंदिरासंदर्भात सुरू असलेल्या वादावरून भाजप देशात जातीवाद पसरवत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा देखील

विखे पाटलांनी समाचार घेतला आहे. २०१४ साली मतमोजणी सुरू असतानाच राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला होता याची आठवण करून देत, तेंव्हा यांना भाजप जातीवादी वाटले नाही

असे विखे म्हणाले. शरद पवारांना सोयीप्रमाणे भूमिका बदलतांना जनतेने बघितले आहे. काळाच्या ओघात ते उद्या भाजपचे समर्थन करायला लागले तर आश्चर्य वाटू नये, असा टोला देखील विखे पाटलांनी शरद पवारांना लगावला आहे.

राज्यात फक्त लूट सुरू असून राज्यातील सामान्य जनता याचे परिणाम भोगत आहे. सरकारने लोकांचा अधिक अंत पाहू नये. सगळ्या भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवून देत मुख्यमंत्र्यांनी आपला

दर्जा टिकवला पाहिजे. मात्र राज्याचे नेतृत्वच असंवेदशील झाले आहे, अशी टीका विखे पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!