माय महाराष्ट्र न्यूज:अरबी समुद्राच्या दक्षिणेला आणि बंगालच्या उपसागरात रखडलेले नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून आज पुन्हा सक्रिय झाला.
हिंदुस्थानच्या दिशेने त्याची आगेकूच सुरू झाली आहे. आपला दरवर्षीचा मार्ग त्याने धरला आहे. आता पुढील 48 तासांमध्ये त्याचा केरळमार्गे हिंदुस्थान प्रवेश होईल असा हवामान तज्ञांचा अंदाज आहे.
यंदा दरवर्षीपेक्षा मान्सून सहा दिवस आधीच अंदमानात दाखल झाला. त्यामुळे त्याची पुढची वाटचालही तशीच असणार आहे. केरळमध्येही तो वेळेपूर्वीच पोहोचेल आणि तिथून
नंतर देशाच्या विविध भागांत सक्रिय होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. 17 मे आणि 19 मे रोजी मान्सूनने बंगालच्या उपसागरात प्रगती केली होती. परंतु अरबी समुद्रात तो पोहोचला नव्हता.
20 मे रोजी मान्सूनचा दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश झाला. तो आता केरळच्या दिशेने वेग घेईल असे वाटत होते. मात्र वातावरण अचानक बदलले आणि मान्सून वाऱयांचा प्रवास रखडला.
25 मेपर्यंत तो अरबी समुद्राच्या दक्षिणेलाच थांबला. याच दरम्यान मोसमी वाऱयांनी बंगालच्या उपसागराच्या दिशेनेही प्रगती केली नाही.