माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंधन दरवाढीने सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले असताना
येत्या 31 मे रोजी पेट्रोल पंप डीलर्स संपाचे हत्यार उपसणार असल्याची माहिती समोर आली आहे. पेट्रोल-डिझेलवरील कमीशन / मार्जिन वाढवण्याच्या मागणीसाठी हा संप केला जाणार आहे.
परिणामी या दिवशी इंधन खरेदीही बंद असणार आहे. त्यामुळे या दिवशी पेट्रोल पंपावर खडखडाट असणार आहे. परिणामी वाहनधारकांना मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात क्रमश: 8 आणि 6 रुपयांची कपात केली होती. या निर्णयानंतर राज्य सरकारने देखील पेट्रोल आणि डिझेलवरी व्हॅट
कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु दुसरीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात 31 मे या दिवशी कोणत्याही प्रकारची इंधन खरेदी न करता पेट्रोल पंप डीलर्सनी संपाची हाक दिली आहे.
पेट्रोल-डिझेलवरील कमीशन / मार्जिन वाढवण्याच्या मागणीसाठी हा संप केला जाणार आहे. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे पेट्रोल पंप चालक-मालक संघटनाच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करून केंद्र सरकारच्या निर्णयाचा सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु पंप चालक- मालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या निर्णयामुळे
आमचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठीच संप पुकरण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.मीडिया रिपोर्टनुसार, राज्यात पेट्रोल पंप डीलर 31 मे रोजी संपावर जाणार आहेत. परिणामी
या दिवशी इंधन खरेदी आणि विक्री बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आतापासून पेट्रोल पंपावर गर्दी व्हायला सुरूवात झाली आहे. वाहनांची पेट्रोल टाकी टाकी फुल्ल करण्यासाठी वाहनधारकांची धावपळ सुरू झाली आहे.
हल्लीच केंद्र शासनानं पेट्रोलची किंमत 8 आणि डिझेलची किंमत 6 रुपयांनी कमी केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार या संपाचा सर्वसामान्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. पण, तरीही
पेट्रोल भरून वाहनांची टाकी फुल्ल करण्यासाठी सर्वसामान्यांची धावपळ सुरु होणार यात शंका नाही.