Saturday, July 2, 2022

मोठी बातमी:पोलीस भरती:गृहमंत्री वळसे पाटलांकडून तारीख ‘जाहीर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्र मधील अनेक तरुण, तरुणी पोलीस भरतीची वाट पाहत आहेत. मैदानी चाचणी, लेखी परीक्षेची जोरदार तयारी

करत आहेत. परंतू राज्य सरकार तारखा कधी जाहीर करणार, पोलीस भरती प्रक्रिया कधीपासून राबविली जाणार आदी बाबत काहीही माहिती मिळत नव्हती. यावर राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे

पाटलांनी वक्तव्य केले आहे. राज्यात ५०००० पोलीस पदे रिक्त आहेत. सध्या साडे पाच हजार मुलांची भरती पूर्ण होत आली आहे. सात हजार पदांची भरती काढली जाणार आहे. जूनच्या

१५ तारखेपासून ही प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. यानंतर राज्य मंत्रिमंडळासमोर आणखी १५ हजार पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे, असे वळसे पाटील म्हणाले. ही मोठी भरती

करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ नक्कीच परवानगी देईल. पोलिसांवर खूप ताण आहे, तो कमी करण्यासाठी ही भरती गरजेची असल्याचे वळसे पाटील म्हणाले. नागरिक किंवा मुले गेम

खेळण्यासाठी अनेक अॅपबेस्ड कंपन्यांकडून कर्ज काढतात. गरजेसाठी कर्ज काढले तर वेगळी गोष्ट, परंतू असे केल्याने फसवणुकीचे गुन्हे होत आहेत. सायबर क्राईम वाढत चालले असून

पोलिसांवरील ताण वाढत आहे. यामुळे अनावश्यक गोष्टींसाठी कर्ज काढणे टाळावे. राज्य सरकार कारवाई करत आहे, परंतू सारे काही आपल्या हातात नाही, असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

पोलिसांच्या घरांसाठी दरवर्षी ८०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. काही ठिकाणी प्रकल्प हाती घेता येतील का याचे प्रयत्न सुरु आहेत. पोलीस वसाहत किंवा स्व:ताचे घर कसे मिळेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे वळसे पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!