माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाचे दोन वर्षे आणि मागील वर्षी बदल्यांसाठीचे नवीन आलेले ऑनलाईन सॉफ्टरवेअर यामुळे शिक्षकांच्या बदल्या रखडल्या होत्या. तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या
शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या रखडलेल्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. नवीन बदली धोरणानुसार राज्यातील संवर्ग एक आणि संवर्ग दोनमधील मिळून बदल्या करण्यात आल्या आहे. राज्यातील एकूण १० हजार ९० शिक्षकांच्या
जिल्हांतर्गत बदल्या झाल्या आहेत. नवीन सॉफ्टवेअर प्रणालीनुसार झालेली ही पहिलीच बदली प्रक्रिया आहे. आता बदल्यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्वाची माहिती दिलीय.पुण्यात जी २० परिषद होतेय याचा आम्हाला अभिमान आहे.
ही एक चांगली गोष्ट आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. हे सांस्कृतिक शहर आहे. यामुळे भारतीय संस्कृतिचे दर्शन जगभरातून आलेल्या लोकांना होणार आहे. शाळेच्या गणवेश बाबत आपण भूमिका जाहीर केली आहे. कोणतीही शाळा अमुक एका दुकानातून गणवेश घ्या,
असे आग्रह करु शकत नाही. जर एखादी शाळा असे म्हणत असेल तर त्या शाळेची चौकशी होईल. सर्व शाळांनी एकसारखा कपडा घ्यावा, पण त्याची किंमत कमीत कमी असली पाहिजे. त्यातून नफेखोरी होती काम नये.
शिक्षकांचा सातत्याने बदल्या झाल्या तर शिक्षकांवरही परिणाम होतो. तसेच शाळेवर परिणाम होत असतो. शिक्षकांनाही त्या शाळेत लक्ष केंद्रित करता येत नाही. त्यामुळे प्रशासकीय शिक्षकांच्या बदल्या रद्द कराव्या, अशी चर्चा सुरु आहे.
यासंदर्भात ग्रामविकास मंत्रालय आणि शालेय शिक्षण मंत्रालय लवकरच धोरण ठरवणार आहे.