माय महाराष्ट्र न्यूज:आजच्या काळात बहुतेक लोक घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी तसेच घरात समृद्धता तसेच प्रसन्नता राहण्यासाठी अनेकजण घरी झाडे लावतात,बाग तयार करतात
पण तुम्हाला माहिती आहे का की काही झाडांचा संबंध तुमच्या नशीबाशी असतो. अगदी सोपी भाषेत लकी-अनलकी म्हणता येईल. ज्योतिष शास्त्रात काही अनेक शुभ आणि अशुभ
झाडांचे वर्णन करण्यात आले आहे.काही झाडे घरातील लोकांचे भाग्य उजळवते, तर दुसरीकडे काही झाडे अशी असतात ज्यांचा आपल्या जीवनावर खूप वाईट परिणाम होतो. कधी
कधी अशी झाडे आपले जीवन पूर्णपणे नष्ट करू शकतात. आज आपण अशाच झाडांबद्दल जाणून घेणार आहोत.बाभूळचे झाडबाभूळचे झाडाविषयी बऱ्याच संकल्पना आहे.
याविषयी अनेक गोष्टी बोलल्या जाते. असं म्हणतात हे काटेरी रोप घरात लावल्याने नकारात्मकता वाढू लागते आणि घरात गरीबी येते. या रोपामुळे घरात तणावाचे वातावरण असते. या झाडामुळे विविध रोग घरावर हल्ला
करतात.कापूसज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहिले तर कापसाचे झाड घरात ठेवल्याने दुर्दैव आणि गरिबी येते. परस्पर संबंधांमध्ये गैरसमज सुरू होतात आणि नकारात्मकतेचे
वातावरण तयार होऊ लागते. या कारणास्तव घरामध्ये चुकूनही कापसाचे रोप लावू नका.मेंहदीचे रोपबरेच लोक घरात मेहंदीचे लहान आकाराचे रोप लावतात, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार
असे अजिबात करू नका कारण मेहंदीचे रोप घराच्या आत बागेत लावल्यास नकारात्मक ऊर्जा प्रसारित होऊ लागते.