Thursday, June 30, 2022

नगर ब्रेकिंग:या महामार्गावर मोठा अपघात; १ ठार ८ गंभीर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर-औरंगाबाद महामार्गावर खोसपुरी शिवारात शुक्रवार दि. २७ रोजी पहाटे क्रुझर गाडीला झालेल्या भीषण अपघातात

एक जण जागीच ठार झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.खोसपुरी शिवारातील हॉटेल संग्राम पॅलेस समोर उभ्या असलेल्या ट्रकला (क्र. एम. एच. १४ एच.यु. ०२२७) नगर

कडून औरंगाबाद कडे निघालेल्या क्रुझर गाडीने (क्र. एम. एच.१६ ए.टी.१४०६) भरधाव वेगात पाठीमागून जोराची धडक दिली. हा अपघात पहाटे चारच्या सुमारास घडला.अपघातात

शांताराम लक्ष‍मण घन (वय ४० रा. घनवाडा ता. सोयगाव जिल्हा औरंगाबाद ) हा जागीच ठार झाला, तर श्रद्धा कैलास पवार (वय ३०), विकी नाना पाटील (वय २७), नंदा शांताराम घन (वय ३२),वेदांत

शांताराम घन ( वय १४), खुशी शांताराम घन (वय ११), राजपाल अशोक पवार (वय १५), राजगुरू कैलास पवार ( वय २२), कैलास अर्जुन पवार ( सर्व रा. जामनेर तालुका जामनेर) हे जखमी झाले आहेत.

जखमी मधील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. जखमींवर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघाताची माहिती समजताच सोनई, जेऊर, जिल्हा

रुग्णालय व मिरी येथील चार ‘१०८’ रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. यावेळी १०८ रुग्णवाहिका चालक हर्षल तोडमल,

भाऊसाहेब बंगे, डॉ. सचिन कोरडे यांनी जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मोठी मदत केली. १०८ रुग्णवाहिका एक प्रकारे जखमीं साठी जीवनदायिनी ठरल्या आहेत.

एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!