Thursday, June 30, 2022

ठरलं, या दिवशी जाहीर होणार बारावीचा निकाल ?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात महाराष्ट्र राज्याच्या बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तयारी सुरू आहे.

निकाल ५ जून ते १० जून २०२२ या कालावधीत कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. लवकरच निकालाची अधिकृत तारीख बोर्डाकडून जाहीर केली जाईल.निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना

त्यांचे वैयक्तिक गुणपत्रक ऑनलाइन बघण्याची सोय https://msbshse.co.in/ या वेबसाइटवर बघण्याची सोय उपलब्ध होईल. यासाठी ज्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचा

निकाल बघायचा आहे त्याचा सीट नंबर तसेच संबंधित व्यक्तीच्या आईचे नाव नमूद करावे लागेल. यानंतर व्ह्यू रिझल्ट या बटणावर क्लिक करताच वैयक्तिक गुणपत्रक बघता येईल.

एखाद्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला निकालाविषयी आक्षेप असतील किंवा विशिष्ट विषयात देण्यात आलेल्या गुणांविषयी आक्षेप असतील तर तक्रार करता येईल. या संदर्भातील प्रक्रिया

बोर्डाकडून निकालाची तारीख जाहीर केली जाईल त्याच दिवशी सांगितली जाईल. बारावीची महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा ४ मार्च ते ३० एप्रिल २०२२ या कालावधीत पार पडली. पेपर तपासणीचे

काम वेगाने सुरू आहे. अनेक पेपर तपासून पुन्हा बोर्डाकडे जमा झाले आहेत. तपासणीची प्रक्रिया शनिवार २८ मे २०२२ रोजी संपणार आहे. यानंतर निकाल जाहीर करण्यासाठी पुढील टप्प्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला १४.७२ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते. शिक्षकांचा संप, औरंगाबादमध्ये पेपर तपासणी प्रक्रियेचा मंदावलेला वेग यामुळे

निकाल लागण्यास दिरंगाई होईल अशी शक्यता वाटत होतील. पण वाया गेलेला वेळ भरून काढत शिक्षकांनी निकालाशी संबंधित कामकाज वेगाने पूर्ण करायला सुरुवात केली आहे.

उत्तम नियोजन करून निकालाचे काम अंतिम टप्प्यापर्यंत आणण्यात आले आहे. यामुळेच निकाल ५ ते १० जून २०२२ दरम्यान कधीही लागेल असे संकेत मिळत आहेत.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!