नेवासा
जून महिन्याच्या प्रारंभीच हुमनी अळीचे भुंगेरे पकडून ते नष्ट केल्यास त्याचा प्रादुर्भाव होणार नाही व त्यापासून पिकाचे संभाव्य होणारे नुकसान टळेल असे कृषि विज्ञान केंद्र-दहिगावनेचे विषय विषेषज्ञ नारायण निबे यांनी सांगितले.
नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे कृषि विज्ञान केंद्र-दहिगावने व तालुका कृषी विभागाचे वतीने हुमणी आळी प्रतिबंधक उपाययोजना मेळावा घेण्यात आला.त्यावेळी मार्गदर्शन करताना श्री.निबे बोलत होते.
मंडल कृषीधिकारी वृषाली पाटील म्हणाल्या , सध्या हुमणी अळी तयार होणारे भुंगे निघण्यास सुरुवात होणार आहे. रात्री लिंब , बाभुळ या झाडावर विजेचे दिवे लावावेत व त्याखाली राकेल मिश्रित पाणी साठवून भुंगे त्यात नष्ट करावेत. म्हणजे हुमनी अळी तयार होणार नाही , व आपल्या पिकांचे नुकसान टळेल. मेळाव्यत भुंगे,अंडी , अळी , कोष ,हुमणी अशा अवस्था व तीची उपजिवीका , किटकनाशके व त्याचे वापराची पध्दती आदिंबाबत सविस्तर माहिती दिली . संजय कदम, प्रकाश बहिरट आदिंनी मेळाव्यत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास शरद आरगडे , भागचंद चामुटे ,बाळासाहेब , सचिन आरगडे , स्वप्निल गरड रावसाहेब आरगडे , संदीप पंडित,कारभारी गरड , मारुती नजन , सागर झुंगाळ , शिवनाथ आढाव , शिवनाथ आढागळे, आकाश नजन , श्रीकांत शिंदे, त्रिंबक मिसाळ, वसंत गोरडे , प्रणव नजन , नितीन गोरडे आदिंसह शेतकरी उपस्थित होते.