माय महाराष्ट्र न्यूज:औषधांच्या दुकानात मोजकीच औषधं डॉक्टर्सच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळतात. बऱ्याच औषधांसाठी डॉक्टर्सचं प्रिस्क्रिप्शन लागतं.
सध्या OTC औषधांसाठी कोणताही कायदा नाही. परंतु सरकार लवकरच नियमांमध्ये बदल करणार आहे. त्यानंतर डॉक्टर्सच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय 16 औषधं खरेदी करणं शक्य होणार आहे.
सरकारने ओव्हर-द-काउंट कॅटेगरी सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यासाठी ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स नियमांमध्ये बदल करावे लागणार आहेत. यानंतर डॉक्टर्सच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय काही औषधं खरेदी करणं शक्य होणार आहे .
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात एका अधिसूचनेचा मसुदा अर्थात ड्राफ्ट प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये 16 औषधांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पॅरासिटामॉल
500 एमजी, काही लेगेटिव्ह्ज, नेझल डिकन्जेस्टंट आणि अँटीफंगल क्रीम यांचा समावेश आहे. मंत्रालयाने या प्रस्तावावर नागरिकांच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत. एका महिन्यात यावर आपलं मत नोंदवता येणार आहे.
सध्या औषधांच्या दुकानात अनेक औषधं डॉक्टर्सच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय उपलब्ध आहेत. परंतु, OTC औषधांसाठी कोणताही कायदा नाही. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मनीकंट्रोलला
सांगितलं, की या वर्षाच्या सुरुवातीला ड्रग्ज टेक्निकल अॅडव्हायझरी बोर्डाने OTC औषधांवरच्या सरकारच्या नवीन धोरणाला मान्यता दिली होती. DTAB ही औषधांच्या बाबतीत सरकारला सल्ला देणाऱ्या सर्वोच्च संस्थांपैकी एक आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितलं, की “यानंतर ओटीसी कॅटेगरीसाठी मंजूर औषधांवर विस्तृत चर्चा झाली. सुरुवातीला यामध्ये 16 औषधांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भविष्यात या यादीचा विस्तार केला जाईल आणि आणखी औषधांचा त्यात समावेश केला जाईल.