Friday, July 1, 2022

या एका चुकीमुळे कमी होतो पुरुषांचा स्पर्म काऊंट

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आजकाल लठ्ठपणाची समस्या उद्भवणं खूप सामान्य आहे. लठ्ठपणामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागत आहे.

रोजच्या खाण्यापिण्याच्या, जीवनशैलीच्या सवयी लठ्ठपणाला जबाबदार असतात. एकदा वजन वाढलं की माणसाला कोणत्याही अवयवाचा त्रास जाणवतो शकतो. त्याचप्रमाणे वजन

वाढल्यानंतर लैगिंक आरोग्यावरही परिणाम होतो. वजन जास्त वाढल्यानं स्पर्म काऊंट कमी होतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार वजन कमी केल्यानं पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट डबल होऊ शकतो.

डेनमार्कच्या वैज्ञानिकांनी एका अभ्यासात ५६ पुरुषांना सहभागी करून घेतले.या अभ्यासात सहभागी असलेल्या सगळ्यांनाच ८ आठवड्यापर्यंत ८०० कॅलरी घेण्यास सांगण्यात आले.

सुरूवातीला ज्या पुरुषांचा बीएमआय ३२ होता. या दरम्यान वजन १६.५ किलोपर्यंत कमी झाले. यावेळी सगळ्या पुरुषांच्या स्पर्म काऊंटमध्ये ४१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

ज्या लोकाचं वजन कमी झालं होतं आणि त्यांनी आपलं वजन मेटेंन ठेवलं त्यांच्यात स्पर्म काऊंट दुप्पट झाल्याचं दिसून आलं.कोपहेगन युनिव्हर्सिटीच्या एक्सपर्ट्सना दिसून आलं की ज्या

लोकांमध्ये बेली फॅट जास्त आहे. त्यांची सीमेन क्वालिटी फारशी चांगली नव्हती. पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट १७ वर्षांपासून चे ४० वर्षांपर्यंत व्यवस्थित असतो नंतर स्पर्म काऊंट

कमी व्हायला सरूवात होते. प्रति मिलिलीटर सिमेनमध्ये १५ मिलियन स्पर्म्स असणं नॉर्मल स्पर्म काऊंट मानला जातो. वाढत्या वयात पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट कमी होत जातो. तज्ज्ञ यामागे लठ्ठपणा,

खराब आहार, प्रदूषण जबाबदार असल्याचं तज्ज्ञ सांगतात.स्पर्म काऊंट कमी असल्यामुळे आजकाल विवाहीत लोकांना मुलं होण्यास समस्या येत आहेत. लठ्ठपणामुळे टेस्टोस्टेरॉन

लेव्हल कमी होते ज्यामुळे स्पर्म उत्पादन कमी होतं. तज्ज्ञांना आढळलं की लठ्ठ लोकांमध्ये इतरांच्या तुलनेत स्पर्म काऊंट खूपच कमी होता.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!