नेवासा/सुखदेव फुलारी
तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानचे वतीने देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष स्व.बाबुराव बानकर पाटील यांचे स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा यंदाचा शनिरत्न पुरस्कार पुणे येथील उत्तरा फुड्स अँड फिड्सचे कार्यकारी संचालक बी व्यंकटेश राव यांना दि.31 मे रोजी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हस्ते व पद्मश्री पोपटराव पवार यांचे अध्यक्षतेखाली देण्यात येणार असल्याची माहिती श्री शनैश्वर देवस्थानचे भागवत बानकर यांनी दिली.
अधिक माहिती देताना श्री.बानकर पुढे म्हणाले,सोमवार दि. ३० मे २०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता श्री शनिजयंती महोत्सव २०२२ निमित्ताने जनकल्याण प्रित्यर्थ महायज्ञ व शनिजन्मोत्सव सोहळा होणार आहे.
तर मंगळवार दि.३१ मे रोजी सकाळी १०.०० ते १२.३० ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे शास्त्री (परळी) यांचे जाहिर हरी किर्तन होईल.दुपारी १२.३० ते १.३० वा. शनिरत्न पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.
दि.३० व ३१ रोजी कार्यक्रमा नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पुरस्कार प्रदान सोहळ्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर,उपाध्यक्ष विकास बानकर, सरचिटणीस बाळासाहेब बोरुडे,चिटणीस आप्पासाहेब शेटे,
कोषाध्यक्ष दिपक दरंदले,विश्वस्त पोपट शेटे, पोपट कुऱ्हाट,डॉ. शिवाजी दरंदले,छबुराव भुतकर,शहाराम दरंदले,सौ.सुनीता आढाव,मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष दरंदले यांनी केले आहे.