Thursday, June 30, 2022

सर्व बँक खातेदारांसाठी मोठी बातमी, 4 लाखांचे ….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. छोट्या रकमेचा प्रीमियम भरून तुम्ही यापैकी काही योजनांचा लाभ घेऊ शकता.

केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या अशा दोन योजना म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना.या दोन विमा योजनाद्वारे अतिशय

कमी रकमेचा विमा हफ्ता भरून सर्वसामान्य नागरिकांना विम्याचा लाभ दिला जातो आहे. हा हफ्ता वार्षिक स्वरुपातील असून तो वर्षातून एकदा तुमच्या बॅंक खात्यातून आपोआप कापला जातो.

अर्थात त्यासाठी आधी तुम्ही या दोन योजनांसाठी नोंदणी केलेली पाहिजे. यासाठी तुमच्या बॅंकेकडून तुम्हाला विचारणा होते. त्यावेळेस तुम्ही फक्त स्वीकृती द्यायची असते.

तुमच्या माहितीसाठी, तुम्ही प्रीमियम भरून या योजनांचा लाभ घेऊ शकता. दरवर्षी 31 मे पर्यंत त्यांचे नूतनीकरण केले जाते. त्यांच्या नूतनीकरणासाठी, तुमच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम असणे

आवश्यक आहे. ही नूतनीकरणाची रक्कम मागील वर्षांमध्ये नावनोंदणी केलेल्या लोकांच्या खात्यातून स्वयंचलितपणे डेबिट केली जाते.तुम्हाला माहित आहे का की प्रधानमंत्री जीवन

ज्योती विमा योजने मध्ये 18 ते 50 वर्षे वयोगटातील लोक सामील होऊ शकतात. यासाठी 2 लाख रुपयांचा आयुर्विमा दरवर्षी फक्त 330 रुपयांचा हफ्ता भरून उपलब्ध होतो. त्याचप्रमाणे,

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत 18 ते 70 वर्षे वयोगटातील लोक सामील होऊ शकतात. यामध्ये 12 रुपयांच्या अत्यल्प रकमेत 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत, अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व कव्हर केले जाते. अपघाती मृत्यू झाल्यास विमाधारकास 2 लाख रुपये आणि अंशतः अपंगत्व

आल्यास विमाधारकास 1 लाख रुपये देण्याची तरतूद आहे. त्यानुसार 31 मे पर्यंत दोन्ही योजनांसाठी 342 रुपयांचा वार्षिक प्रीमियम भरावा लागेल.

तुमच्या खात्यात पुरेशी शिल्लक नसल्यास तुम्हाला विमा संरक्षण मिळू शकणार नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला 4 लाख रुपयांच्या विमा संरक्षणापासून वंचित राहावे लागेल. त्यामुळेच

तुमच्या बॅंक खात्यात पुरेशी रक्कम ठेवा आणि या दोन्ही योजनांचा लाभ घ्या.आयुर्विमा हा आर्थिक नियोजनातील अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. मात्र बरेचवेळा लोक आपल्या कुटुंबाच्या

खऱ्या आवश्यकतेचा किंवा गरजेचा अंदाज न घेता आयुर्विमा पॉलिसी घेतात. यामुळे तुमचे आर्थिक नियोजन परिपूर्ण न होता त्यात एक महत्त्वाचा घटक कमकुवत ठरू शकतो. आयुर्विम्याचा

मुख्य हेतू विमाधारकाच्या पश्चात त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा, आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करणे हा असतो.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!