Sunday, July 3, 2022

मोठी बातमी:पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता; महाराष्ट्रात कोरोना रुग्णात होतेय वाढ

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जगावर असलेले कोरोनाचे सावट अद्याप काही संपले नाही. कोरोनाची भीती पुन्हा वाढू लागली आहे. कारण कोरोनाच्या

नवीन व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. अशामध्ये महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मुंबईमध्ये

देखील कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना मास्कचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. अशामध्ये आता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केली आहे.मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘

कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, महाराष्ट्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जर दैनंदिन प्रकरणे 1 हजारांच्या वर वाढली तर पुन्हा निर्बंध लादण्याची आवश्यकता असेल.’

तसंच, ‘ज्यापद्धतीने कोरोना रुग्ण वाढत आहेत त्यामुळे निर्बंध आणावेच लागतील. विमानसेवेमध्ये अद्याप निर्बंध कायम आहेत. लोकांनी काळजी घेतली नाही आणि रुग्णसंख्या वाढली तर

निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.’, असे अस्लम शेख यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेत मास्कचा वापर करावा असे आवाहन केले जात आहे.

दरम्यान, मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारची चिंता पुन्हा वाढली आहे. गुरुवारी राज्यात 500 पेक्षा अधिक नवीन

प्रकरणांची नोंद झाली. मुंबईत कोरोना रुग्णांनी 300 चा टप्पा ओलांडल्यामुळे रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने सप्टेंबर महिन्यात कोरोनाची चौथी लाट येऊ शकते,

असे सांगितले होते. आता रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचसोबत

मुंबईमध्ये लोकल प्रवास करताना आणि रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश करत असताना नागरिकांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!