Thursday, June 30, 2022

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. काही दिवसांसाठी जनशताब्दी आणि गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

इगतपुरी येथील टिटोली यार्डातील तांत्रिक कामांमुळे मध्य रेल्वेने आज शनिवारपासून सहा दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केल्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे . मेगा ब्लॉकमुळे

गोदावरी एक्सप्रेस व मुंबई – जालना जनशताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या विलंबाने धावणार असल्यामुळे प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.

येथील मध्य रेल्वेच्या टिटोली यार्डात रेल्वे प्रशासनातर्फे २८ मे ते १ जून या दरम्यान तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार आहेत . या कामांमुळे मनमाड – मुंबई – मनमाड गोदावरी स्पेशल रेल्वे.

२८ मे ते २जूनदरम्यान दोन्ही बाजूंनी धावणार नाही . त्याचप्रमाणे मुंबई – जालना जनशताब्दी एक्स्प्रेस ३० आणि ३१ तारखेला सुरु होणाऱ्या स्थानकापासूनच पूर्णपणे रद्द होईल . तसेच

परतीची जालना – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस दि . ३१ मे आणि १ जून रोजी सुरु होणाऱ्या स्टेशनपासून पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.भुसावळ ते इगतपुरी स्टेशनदरम्यान धावणारी

” मेमू ” इगतपुरीपर्यंत न येता नाशिकरोड स्टेशनपर्यंतच धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. त्यामुळे चार – पाच दिवस चाकरमाने , विद्यार्थी आणि अन्य प्रवाशांना

गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात नाशिकरोड रेल्वे स्थानकातून मुंबईला जाणाऱ्या मेल , एक्स्प्रेस नियंत्रित करून चालविण्यात येणार असल्याने त्या एक ते दोन तास उशिराने धावतील.

तसेच, मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या मेल व एक्स्प्रेस नाशिकरोडपर्यंत एक ते दोन तास उशिराने धावण्याची शक्यता असून , नाशिकरोडनंतर सुरळीत जातील. मेगाब्लॉकच्या

काळात १५२ एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होणार असल्याने याचा फटका प्रवासी व चाकरमान्यांना बसणार आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!