Thursday, June 30, 2022

कॉंग्रेसच्या माजी मंत्र्याची आत्महत्या; सुनेने नातीच्या लैंगिक शोषणाचा केला होता आरोप 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कॉंग्रेस पक्षाचे माजी मंत्री राजेंद्र बहुगुणा यांनी आत्महत्या केली आहे. बहुगुणा यांच्यावर त्यांच्या सुनेने त्यांच्या नातीचा विनयभंग केल्याचा आरोप केला होता, त्यामुळे

व्यथित झाल्याने त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून स्वत:वर गोळी झाडली. बहुगुणा यांच्या सुनेने नातीचा विनयभंग केल्याचा आरोप केल्यानंतर त्यांच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे

संरक्षण या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, असे हल्द्वानीचे मंडळ अधिकारी भूपिंदर सिंग धोनी यांनी सांगितले.धोनी यांनी सांगितले की, “शेजारी सविता नावाच्या महिलेच्या

तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये सविता या महिलेने आरोप केला आहे की जेव्हा ती तिच्या सासूसोबत फिरायला जाते तेव्हा आरोपी

माजी मंत्री तिला शिवीगाळ आणि धमक्या देण्यासोबतच तिच्यावर हल्ला करतात.” आत्महत्या करण्यापूर्वी बहुगुणा यांनी ११२ क्रमांकावर पोलिसांना फोन केला होता, त्यानंतर बंदुकीने गोळ्या

झाडत पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या केली. दरम्यान बहुगुणा यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी सुनेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.धोनी यांनी

आणखी म्हटले की, “एक पोलिसांची टीम घटनास्थळी पोहचली आणि मोठ्या चर्चेनंतर बहुगुणा यांनी टाकीवरून खाली उतरण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी अचानक बंदूक काढली आणि स्वतःच्या

छातीत गोळी झाडली. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांचे प्राण वाचवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचे संभाव्य कारण विचारले

असता सीओ म्हणाले की, कारण अद्याप स्पष्ट झाले नाही परंतु वादग्रस्त प्रकरण आणि गंभीर आरोपांमुळे ते अस्वस्थ झाले होते.राजेंद्र अवगुणा हे पहिल्यापासूनच काँग्रेसशी संबंधित

होते, त्यांनी रोडवेज असोसिएशनसह इतर अनेक संघटनांमध्येही उच्च पदांवर काम केले होते. उत्तराखंड रोडवेज कर्मचारी बहुगुणा यांना २००२ मध्ये राज्याच्या पहिल्या

निवडून आलेल्या सरकारमध्ये राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!