माय महाराष्ट्र न्यूज: सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना संगमनेर शहरातून समोर आली आहे.
याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.दोन वर्षांपूर्वी पब्जी गेमच्या माध्यमातून मुलीची आरोपींशी ओळख झाली होती. या ओळखीतून पुढे भेटण्याचे ठरले. मुलगी जेव्हा भेटण्यासाठी गेली.
त्यावेळी दोघे जण उपस्थित होते. या दोघांनी मुलीला त्या ठिकाणाहून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने आरडा-ओरड केल्याने स्थानिक नागरिक धावून गेले, त्यावेळी संशयितांनी तिथून पळ काढला.याप्रकरणी संगमनेर पोलीस स्टेशनला
फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मुलीच्या फिर्यादीवरुन बिहार राज्यातील अकरम शेख आणि नेमतुल्ला यांना अटक करण्यात आली आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा प्रकार असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांचा
तपास सुरु असून हे प्रकरण धर्मांतर की लव्ह जिहाद हे स्पष्ट होणार आहे. याबाबत अजून पोलिसांना माहिती दिली नसून तपासानंतर या प्रकरणातील तथ्य समोर येणार आहे.संशयित आरोपींना
न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलीस रिमांडची मागणी करण्यात आली आहे.या प्रकरणाचा शहरातील हिंदुत्ववादी संघटनाकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे.