नेवासा/सुखदेव फुलारी
प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल ‘ड’ यादी सर्व्हे करुन पात्रता यादी तयार झाली आहे.घरकुलाचे सन 2022 चे लक्ष आले असुन त्यात नेवासा तालुक्यात प्रधानमंत्री घरकुलासाठी 15438 लाभार्थी पात्र ठरले आहेत.पात्रता यादीत लोकसंख्येच्या प्रमाणात सौंदाळा अव्वल ठरले आहे.
“ड” यादीसाठी मोठ्या प्रमाणात जाचक अटी शासनाकडुन टाकलेल्या होत्या अशा अटींमुळे खुप मोठ्या प्रमाणात लाभार्थी वंचित राहिल्याची तक्रार विविध सरपंच संघटनांकडुन केली होती. “ड” यादी सर्व्हे करताना केंद्र सरकारने आधार लिंकींगचा वापर केल्याने वाहन धारक आपोआप रद्द झाले. तसेच किसान क्रेडीट कार्ड लाभधारक देखील वगळण्यात आले. आणि घरातील वस्तु फ्रिज, सायकल देखील या यादीतीतुन वगळण्यास कारणीभुत ठरल्याचे शासन आदेशातुन समजते.अशा सर्व अटीं असुन देखील
प्रधानमंत्री घरकुल पात्र लाभार्थींना यादीतील क्रमवारीनुसार लाभ मिळणार आहे.त्यामुळे शासनाकडुन लक्ष वाढवण्यात यावे अशी सरपंच संघटनेने मागणी केली आहे.
नेवासा तालुक्यातील गावातील लोकसंख्येच्या प्रमाणात घरकुल पात्र यादीतील आकडेवारीनुसार अशी..
अमळनेर 171, अंतरवली
125, बाभूळखेडा 86,
बहिरवाडी 115, बकुपींपळगाव 49,
बऱ्हाणपूर 64, बेल्हेकरवाडी 90,
बेलपंढरी 62,बेलपिंपळगाव 288, भालगाव 103, भानसहिवरे 459,
भेंडे बुद्रुक 284,भेंडा खुर्द 00, चांदा 447, चिलेखानवाडी 194, चिंचबन 106,देडगाव 326, देवगाव 207, देवसडे 92, धनगरवाडी 164,
दिघी 164, फत्तेपूर 74,गळनिंब 34,
गणेशवाडी 95, गेवराई 99, घोडेगाव 320, घोगरगाव 208, गिडेगाव 62, गोधेगाव 107, गोगलगाव 189,
गोमळवाडी 62, गोंडेगाव 59, गोणेगाव 69, गोपाळपूर 60, हंडीनमगाव 108,हिंगोनी 24, जैनपूर 92, जल्के बीके.48, जल्के ख.173,
जयगुडे आखाडा 90, जेऊर हैबती 210, कांगोनी 184,
कारजगाव 196, कारेगाव
21, कौठा 54, खडक 36,खामगाव 108, खरवंडी 148, खेडले काजळी 20,खेडले परमानंद 36,
खुणेगाव 37, खुपटी 216,कुकाणा 97,लांडेवाडी 227,लेकुरवाळे आखाडा 28,लोहरवाडी 23,लोहगाव
240,महालक्ष्मी हिवरे 129,माका 109,मक्तपूर 120, मळीचिंचोरा 328,
मंडेगव्हाण 45, मंगळापूर 25,
म्हाळसपिंपळगाव 89, मोरेचिंचोरे 211, मुकींदपूर 341, मुरमे 41,नागापूर 49,नाजिक चिंचोली 20,नांदूर शिकारी 119,नारायणवाडी
74,नवीन चांदगाव 66, नेवासा बुद्रुक 409, निंभारी 28, निपाणी निमगाव 137, पाचेगाव 197, पाचुंदे 182, पानसवाडी 248, पानेगाव 141,
पाथरवाला 107, पिचडगाव 25, पिंप्रीशहाली 170, प्रवरासंगम 16, पुनतगाव 93, राजेगाव 59, रामडोह 73, रांजनगाव 55, रस्तापूर 60, सलाबतपूर 136, शहापूर 110, शिंगणापूर 106, शिंगावे तुकाई 159, शिरसगाव 120, शिरेगाव 194
सोनई 726, सौंदाळा 276,सुकळी खुर्द 54, सुलतानपूर 104, सुरेगाव (गंगा) 86,सुरेशनगर 46, तामसवाडी 104, तरवडी 196, तेलकुडगाव 232,टोका 77,उस्थळ दुमाला 208,उस्थळ खालसा 19,वडाळा बहिरोबा 238,वडुले 132, वाकडी 143,वांजरवाडी 157, वांजोळी 213, वरखेड 262, वाटापूर 43, झापवाडी 103.नेवासा तालुक्यातील एकूण
15438 लाभार्थींचा पात्र ठरले आहेत.
लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वाधिक घरकुल पात्रता गावे…
सोनई 726, भानसहिवरे 459, चांदा 457, नेवासा बु.409, मुकिंद्पूर 341, माळीचिंचोरा 328, देडगाव 326,बेलपिंपळगाव 288 पात्र झाले आहेत.
*पात्रता यादीत लोकसंख्येच्या प्रमाणात सौंदाळा अव्वल-सौ.आरगडे
प्रधानमंत्री घरकुलासाठीच्या पात्रता यादीत लोकसंख्येच्या प्रमाणात सौंदाळा गाव अव्वल असून पात्र यादीत एकुण 276 पात्र लाभार्थींचे नावे आहेत.काळजीपुर्वक सर्व्हे करुन ग्रामस्थांना लाभ मिळवुन दिला व पात्रता यादीत सर्वाधिक नावे आल्याबद्दल सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक तसेच शिक्षकांचे ग्रामस्थांकडुन कौतुक करण्यात आले आहे.
–सौ.प्रियंका शरदराव आरगडे
लोकनियुक्त सरपंच,सौंदाळा