Friday, July 1, 2022

8 दिवस राहणार बँका बंद

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसातच मे महिना संपून जून महिना सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर जूनमध्ये बँकेत काही काम असेल

तर बँकांच्या सुट्ट्याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. कारण जून महिन्यात बँका 8 दिवस बंद राहणार आहे. या बँक सुट्ट्यांमध्ये 6 दिवसांच्या साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे.

तर इतर काही दिवशी प्रादेशिक सणांमुळे बँका बंद राहतील. रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार बँक जून महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 2 जून रोजी बंद राहणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानुसार (RBI) बँकांच्या सुट्ट्या राज्यानुसार वेगवेगळ्या असतात. फक्त प्रत्येक दूसरा शनिवार आणि सर्व रविवारीची सुट्टी समान असते.

याशिवाय सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व बँका बंद राहतात.जूनमधील पहिली बँक सुट्टी महाराणा प्रताप जयंतीच्या दिवशी 2 जूर रोजी असेल. परंतु या दिवशी बँका फक्त

हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे बंद राहतील. या दिवशी सर्व सरकारी, खाजगी, विदेशी, सहकारी आणि प्रादेशिक बँका बंद राहतील.

तारखेनुसार कधी कधी बंद राहतील बँका?

2 जून- महाराणा प्रताप जयंती (शिमलामध्ये बँक बंद)

5 जून- रविवार

11 जून- दूसरा शनिवार

12 जून- रविवार

१५ जून – गुरु हरबोबिंद जयंती, राजा संक्रांती, वायएमए (मिझोराम, भुवनेश्वर, जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद)

19 जून- रविवार

25 जून- चौथा शनिवार

26 जून- रविवार

हे लक्षात ठेवा की ज्या दिवशी बँका बंद असतील त्या दिवशीही बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम करता येतात. कारण बँकांच्या सर्व सेवा आता

ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. ऑनलाइन सेवा वर्षभर सुरू राहतात. याद्वारे तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित अनेक कामांचा निपटारा करू शकता. बँकेच्या सुट्टीच्या दिवशी फक्त बँक शाखा

बंद असतात. तर एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन, पासबुक प्रिंटिंग मशीन, ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू असते.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!