Sunday, July 3, 2022

विखे पाटलांसमोरच समोरच अतिशय परखड व स्पष्ट शब्दांमध्ये कार्यकर्त्यांची नाराजी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:यापुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप-आणि फक्त भाजपच म्हणून राहणार आहे.

इकडे-तिकडे जाणार्‍यांना आपल्याकडे थारा नाही. तरी यापुढे सर्वांनी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीत भाजपाचीच सत्ता येण्यासाठी

आपल्याला काम करायचे असून त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामास लागावे. श्रीरामपूर नगरपालिकेत भाजपाची सत्ता आणण्याची मोठी संधी असून त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी कामास

लागावे, असे आवाहन माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.श्रीरामपूर येथील अपूर्वा हॉलमध्ये श्रीरामपूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा तसेच तालुक्यातील

सर्व बुध प्रमुख, शक्ती प्रमुख यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी नूतन भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांना आ. राधाकृष्ण विखे पा. व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

आ. विखे पाटील म्हणाले आपले काही लोक काही गावांमध्ये ससाणेंबरोबर युती करतात, काहीजण मुरकुटेंबरोबर युती करतात. काही ठिकाणी तिघांच्याही युती होतात. अशा प्रकारचे

मिक्सिंग आणि फिक्सिंग यापुढे तालुक्यात चालणार नाही. शतप्रतिशत भाजप हाच नारा राहणार आहे, याचा आ. विखे यांनी आवर्जून उल्लेख केला.

दरम्यान श्रीरामपूर येथे भाजपचे बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांच्या मेळाव्यात टाकळीभान येथील निष्ठावंत कार्यकर्ते नारायण काळे यांनी विखे व पटारे यांच्या समोरच अतिशय

परखड व स्पष्ट शब्दांमध्ये नव्या तालुकाध्यक्ष नियुक्तीबाबत नाराजी व्यक्त केली. पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची कत्तल होत राहिल्यास निष्ठावंतांपेक्षा बाहेरून येणारेच शिरजोर होतील, पटारे

यांची नियुक्ती करताना पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी अध्यक्ष निवडीचे नियम धुडकावून देत कोणाच्या तरी दबावाखाली येऊन ही नियुक्ती केली आहे.

त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना श्री. काळे यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!