माय महाराष्ट्र न्यूज:मान्सूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. वेळेआधी मान्सूनमध्ये आल्यानं आनंदाचं वातावरण आहे.
यंदा वेळेआधी मान्सूनचं केरळमध्ये आगमन झालं आहे. राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडत होता. मात्र आता केरळमध्ये मान्सून वेळेआधी दाखल झाल्याने शेतकऱ्यांसह उकाड्याने हैराण झालेल्या
नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाकडून मान्सूनबाबत सर्वात मोठी माहिती मिळाली आहे. यंदा पाऊस चांगला होईल असंही हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी अंदाज वर्तवला होता.
मान्यून वेळेआधी दाखल झाल्याने शेतकरीही सुखावला आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याने आता बळीराजाची शेतीच्या कामाची लगबग सुरू होणार आहे. तरवा पेरणीसाठी लगबग सुरू होईल.
उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळणार आहे. लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल अशी आशा आहे. 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता.
मात्र 29 मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. उद्यापासून राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी होण्याचा इशारा देण्यात आला.मान्सूनच्या प्रवासाला पोषक
वातावरण आहे. उद्यापासून सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या प्रामुख्याने दक्षिण भागात तुरळक ठिकाणी
मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.काही भागांत सोसाटय़ाचा वारा वाहण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.