Saturday, September 23, 2023

नेवासा तालुक्यातील लाभार्थिनी आयुष्यमान भारत कार्ड काढून घेण्याचे आवाहन

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी आरोग्य विमा सेवा योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना योजनेच्या अंगीकृत रुग्णालयात १२०९ आजारावर पाच लाख रुपये पर्यंतचे औषधोपचार मोफत होत असल्याने नेवासा तालुक्यातील लाभार्थिनी आयुष्यमान कार्ड काढून घेण्याचे आवाहन तहसीलदार संजय बिरादार,गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर व तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांनी केली आहे.

नेवासा तहसील कार्यालय,पंचायत समिती कार्यालय व तालुका आरोग्य अधिकारी कार्याल्याने प्रसिद्धीस दिलेल्या संयुक्त पत्रकात म्हटले आहे की,आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना योजनेअंतर्गत नेवासा तालुक्यात श्रीशनेश्वर ग्रामीण रुग्णालय शनिशिंगणापूर हे अंगीकृत रुग्णालय आहे. या योजनेत हृदय विकार , मेंदू विकार ,किडनी विकार, अपघात , कर्करोग अशा गंभीर आजारावर औषधोपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थींना दिला जातो.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे नेवासा तालुक्यात ९२०१६ लाभार्थी आहेत. आज अखेर २०३२६ लाभार्थींनी आयुष्यमान कार्ड काढून घेतले आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थींची यादी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडे उपलब्ध आहे. तालुका प्रशासनाने ग्रामपंचायत कडील आपले सरकार सेवा केंद्राचे केंद्र चालक व खाजगी आपले सरकार सेवा केंद्राचे केंद्र चालक तसेच अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांना याबाबत सूचना दिलेल्या आहेत.
पात्र लाभार्थ्यांनी आयुष्यमान कार्ड काढून घेण्यासाठी रेशन कार्ड आणि आधार कार्ड आणणे आवश्यक आहे.सर्व पात्र नागरिकांनी शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड तयार करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार संजय बिरादार, गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी केले आहे.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!